ग्रामीण भागातील तरुणांना योग्य व्यासपीठ मिळावे-ज्ञानेश्वर आहिरे

Cityline Media
0
हनुमंतगाव संदिप गावडे राहता तालुक्यातील हनुमंतगाव येथील बहुचर्चित.ज्ञानेश्वर अहिरे  चषक पाथरे बुद्रुक या संघाने नुकताच जिंकल्याने खेळाडू समाधान व्यक्त करत आहे,हनुमंतगाव क्रिकेट क्लब व समस्त ग्रामस्थ यांच्या सौजन्याने श्री. ज्ञानेश्वर अहिरे क्रिकेट चषक भरवण्यात आला होता. याप्रसंगी ज्ञानेश्वर अहिरे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील तरुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव मिळावी आणि गावपातळीवर क्रीडा संस्कृती रुजावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी प्रशस्त  क्रिडांगण मध्ये गेल्या सहा दिवसापासून ह्या क्रिकेटचे सामने सुरू होते.यामध्ये अनेक क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता.यावेळी कडाक्याच्या उन्हात परिसरातील क्रिकेट प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या क्रिकेट सामन्यामुळे हनुमंतगावचे वातावरण पूर्णपणे क्रिकेटमय झाले होते.

गावातील नागरिकांनी हे सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.उत्कृष्ट नियोजनामुळे  खेळामध्ये सहभाग घेणाऱ्या खेळाडूंनी समाधान व्यक्त केले. क्रिकेट पाहण्यासाठी महिलाही मैदानावर उपस्थित होत्या.
शेवटच्या साखळी सामन्यांमधील लढती आणखी रंगतदार झाल्या,त्यामुळे या सामन्याचा पुरेपूर आनंद गावकऱ्यांनी घेतला.

सर्वात जास्त मने जिंकली ती पाथरे बुद्रुक संघाने पहिल्या सामन्यापासून जोरदार खेळाचे प्रदर्शन करून या संघाने विजयाची घोडदौड सुरूच ठेवली होती.उत्कृष्ट गोलंदाजी व आक्रमक फलंदाजी तसेच नियोजनबद्ध क्षेत्ररक्षण याच्या जोरावर पाथरे बुद्रुक संघाने विजय खेचून आणुन १११११ रुपयांच्या प्रथम बक्षीसाचा मानकरी ठरला.

दुसरे बक्षीस ५५५५ रुपयांच्या पारितोषिकावर नाव कोरण्यात हनुमंतगाव संघ यशस्वी झाला.तर तिसरे ३३३३ रुपयांचे पारितोषिक वाकडी संघाने पटकावले.
यावेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.एकलव्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे व मान्यवराच्या हस्ते विजयी संघांना विजयी ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले व विजयाची रक्कम देण्यात आली.

यावेळी पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक अशोक घोलप,शिक्षक संजय अनाप,पत्रकार संदिप गावडे,सचिन पवार,दीपक घोलप, भाऊसाहेब आव्हाड, शब्बीर शेख, योगेश्वर तुंबारे, भारत जाधव,विकास अनाप, कामिनी डिंबर, विजय तुंबारे, प्रसाद ब्राह्मणे,अतुल कुलकर्णी,रवींद्र पर्वत, बाळासाहेब पाबळे,सोमनाथ जेजुरकर, चंद्रकांत घोलप, मोहन पंडोरे,नामदेव तुंबारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!