आश्वी प्नतिनिधी संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर येथील धार्मिक क्षेत्रात कार्यरत आदर्श माता सौ.पार्वताबाई तथा साखरबाई सुकदेव वाघे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती दोन मुले,सुना दोन मुली, जावई नातवंडे, एक दिर, पुतणे पुतण्या असा मोठा परिवार आहे.
येथील प्रगतशील शेतकरी सुकदेव वाघे यांच्या त्या पत्नी होत तर आण्णासाहेब वाघे भाऊसाहेब वाघे सौ.रंजना आव्हाड सौ.मंगल गिते यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
