लोणी रुपाली भालेराव आपल्या समृद्ध आणि सुंदर निसर्गाने मानवाला डोळे आणि दृष्टीची एक अमूल्य देणगी दिली आहे.परंतु, या सृष्टीचे सौंदर्य खऱ्या अर्थाने अनुभवण्यासाठी फक्त शारीरिक डोळ्यांची दृष्टी असणे पुरेसे नाही,तर सकारात्मक दृष्टिकोनाची नितांत गरज असते.याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रेरणादायी आणि विचार प्रवर्तक करणारी संकल्पना आहे. 'जशी दृष्टी तशी सृष्टी' या मुख्य संकल्पनेभोवती फिरणारा हे विचार माणसाला स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहण्यास आणि आपली विचारसरणी बदलण्यास प्रवृत्त करतो.
अनेकदा आपण बाह्य परिस्थितीला,समाजाला किंवा आपल्या नशिबाला दोष देत बसतो,परंतु खरा बदल हा आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनातून सुरू होतो अंधार आणि प्रकाशाच्या संकल्पनेचा वापर करून मानवी जीवनाचे एक मोठे सत्य समोर दृष्टीक्षेपात आले आहे.
जर आपण क्षणभर डोळे मिटून चालण्याचा प्रयत्न केला,तर आपल्याला अंधाराची भीती काय असते आणि प्रकाशाचे आपल्या जीवनात नेमके काय महत्त्व आहे,याची तीव्र जाणीव होते.मात्र, आपले आयुष्य खऱ्या अर्थाने उजळवण्यासाठी आणि प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी केवळ डोळ्यांची दृष्टी पुरेशी ठरत नाही.
त्यासाठी मनामध्ये सकारात्मक विचार आणि योग्य दृष्टिकोन असणे गरजेचे असते.जर मनात नकारात्मकतेचा अंधार असेल,तर उत्तम शारीरिक दृष्टी असूनही माणूस जीवनातील आनंद शोधू शकत नाही. याउलट, सकारात्मक दृष्टिकोनाचा वापर करून माणूस अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीवरही सहज मात करू शकतो.
मानवी स्वभावाचे आणि मानसिकतेचे उत्तम विश्लेषण करण्यासाठी एका पाण्याचा ग्लास आणि त्यातील पाण्याच्या पातळीचे अत्यंत रंजक उदाहरण देण्यात आले आहे.एकाच ग्लासाकडे पाहताना दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे दृष्टिकोन कसे असू शकतात, हे यातून स्पष्ट होते.
एका नकारात्मक विचारसरणीच्या व्यक्तीला तो पाण्याचा ग्लास 'अर्धा रिकामा' वाटतो, ज्यामुळे तिच्या मनातील उणिवा आणि असमाधान दिसून येते. याउलट,सकारात्मक विचार असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला तोच ग्लास 'अर्धा भरलेला' दिसतो.पाणी थोडेच आहे आणि ग्लास खूप मोठा आहे,असे म्हणून सतत कुरकुर करणारे अनेक लोग समाजात आढळतात; परंतु 'अर्धा का? होईना पण ग्लास भरलेला तर आहे,पाणी तर मिळते आहे',
असा कृतज्ञतेचा भाव ठेवणारे लोक जीवनात नेहमी आनंदी आणि यशस्वी होतात.आपण नेमके कुठे पाहतो आणि कशावर आपले लक्ष केंद्रित करतो, यावरच आपल्या सुखाची परिमाणे ठरत असतात.
आजच्या आधुनिक आणि वेगवान युगात आपल्या अवतीभोवती अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात.दूरदर्शन किंवा सोशल मीडिया उघडला की चोरी,खून, मारामारी,फसवणूक, भ्रष्टाचार,महागाई अशा बातम्यांचा भडिमार सुरू असतो.
अशा वेळी सामान्य माणसाचे मन सहजपणे नकारात्मकतेकडे झुकते आणि समाजात सगळेच वाईट चालले आहे अशी भावना निर्माण होते. आपण संपूर्ण जगाला एका रात्रीत बदलू शकत नाही आणि समाजातील प्रत्येक वाईट घटना थांबवणे आपल्या हातात नसते; परंतु त्या घटनांकडे आणि परिस्थितीकडे पाहण्याचा आपला स्वतःचा दृष्टिकोन बदलणे नक्कीच आपल्या हातात असते.
प्रत्येक संकटात किंवा वाईट प्रसंगातही काहीतरी सकारात्मक शोधणे आणि त्यातून मार्ग काढणे,हीच खरी मानवी मनाची ताकद आहे.
हे वृत्त मानवी मनाला एक अत्यंत मोलाचा आणि अंतर्मुख करणारा संदेश देतो.शारीरिक दृष्टी उत्तम असूनही जर मनात विचारांचा अंधार असेल, तर त्या दृष्टीचा समाजासाठी किंवा स्वतःसाठी काहीच उपयोग होत नाही.
आज समाजात केवळ डोळे असून चालणार नाही, तर प्रत्येकाने आपली विचार करण्याची पद्धत बदलून 'दृष्टिकोन दान' केले पाहिजे.आपल्या नजरेतून आणखी कोणीतरी जग अनुभवणार असतो. जेव्हा माणूस स्वतःची दृष्टी बदलेल,त्याला ही संपूर्ण सृष्टी अधिक सुंदर, निरामय आणि सकारात्मक वाटू लागेल.
आपल्या मनातील विचारांची दिशा बदलून समाजात सकारात्मक. आणि आणि उद्यमशील परिस्थितीकडे उमेदीने पाहणे हाच खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचा उद्धार करण्याचा मार्ग होय.समोरची सृष्टी पाहण्याकरता आपल्याकडे सकारात्मक दृष्टी हेच आपल्या आयुष्याचे द्योतक आहे.
