मुख्यमंत्री यांचा हस्ते लातूरात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण

Cityline Media
0
लातूर सिटीलाईन न्युज नेटवर्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते'लोकनेते दिवंगत.गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण' कार्यक्रम येथे पार पडला.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रशासन अंतर्गत विविध उपक्रमांचे अनावरण व लाभ वितरण केले.
त्यात लातूर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मित 'लातूर जिल्हा वाटचाल प्रगतीकडे' माहिती पुस्तिकेचे प्रकाशन,'हिरकणी' लातूर लोगोचे अनावरण,१५० दिवसीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत व्हाट्सअ‍ॅप चॅटबॉट सेवेचे उदघाटन,
गुट्टी,ता.जळकोट, येथे ५ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन,तुळजाई महिला समूह, आर्वी, लातूर यांना रुपये २.५ कोटी कर्जाच्या धनादेशाचे वितरण,प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत व रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात चावी वाटप झाले.

यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!