माजी विद्यार्थी मेळावा;भुतकाळातील चुका टाळून भविष्यात विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेता येतात- सौ‌.शालिनी विखे

Cityline Media
0
कोल्हार प्नतिनिधी 'माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने महाविद्यालयात शिक्षण घेवून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी एकत्र येतात,एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करतात,त्यातून खूप काही शिकायला मिळते. त्यामुळे भूतकाळात झालेल्या चुका टाळून भविष्यकालीन विकासाच्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेता येतात. म्हणून माजी विद्यार्थी मेळावा घेणे ही महाविद्यालयांच्या दृष्टीने काळाची आहे.विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात घेतलेल्या पुस्तकी ज्ञानापेक्षा बाहेरच्या जगात घेतलेले अनुभवी ज्ञान महत्वाचे असते.कारण त्याला वास्तवाची अनुभूती असते.' असे प्रतिपादन मा. जि.अध्यक्षा सौ. शालिनी विखे पा. यांनी केले,
कोल्हार येथील 'लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच माजी विद्यार्थी मेळावा' उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ. शालिनी विखे पा. बोलत होत्या, हा मेळावा प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष भास्कर खर्डे  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

आपल्या प्रमुख भाषणात सौ. शालिनी विखे पा.म्हणाल्या की,'विद्यार्थी घडविण्यात ज्याप्रमाणे शिक्षकाचे योगदान असते त्याप्रमाणे संस्थेला मोठे करण्यात माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे असते.प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे विद्यार्थी जगभर मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत.ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे, म्हणून स्वप्न मोठी बघा,ते पूर्ण करण्यासाठी खडतर परिश्रम करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल,' असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. भास्कर खर्ड़े यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्रीकांत निबे. सुरज वडितके व हेमंत सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सौ. शालिनी विखे यांच्या हस्ते कोल्हार महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या ई- कंटेंट डेव्हलपमेंट लॅबचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती प्रभावती शंकर देशपांडे यांनी पहिली ते दहावीच्या विद्याध्यर्थ्यांना दिलेल्या ५० हजार रुपयांच्या शैक्षणिक साहित्याचे साहित्याचे वाटप सौ. शालिनीताई विखे  यांच्या हस्ते झाले.

या मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांनी केले, डॉ. डाळिंबे एस.एन. यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. संगीता धिमते व प्रा. अर्चना लबडे यांनी केले. या मेळाव्यासाठी संभाजीराजे देवकर  सी. अलका संभाजी देवकर मुख्याध्यापिका सौ. दिप्ती आडेप,भाऊसाहेब रघुनाथ खर्डे,चापूसाहेब कडस्कर, दत्तात्रय राजभोज, प्रकाश खडें आदी मान्यवर तसेच पत्रकार सुहास वैद्य,संजय कोळसे, सुहास कोंडेकर आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!