वरवंडीच्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Cityline Media
0
वरवंडीच्या शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 
वरवंडी(संपत भोसले) संगमनेर तालुक्यातील पठारावरील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,प्रवरा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीने प्रजासत्ताक दिनाची सुरुवात केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ मुरलीधर वर्पे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनावर भाषणे केली. त्यात अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन भारतीय संविधान यावर उस्फुर्त भाषणे केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा पाया कसा रचला यावर देखील उत्स्फूर्त भाषणे केली.त्यानंतर येथील थापलिंग तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने इयत्ता १० वी. १२ वी.(विज्ञान) आणि १२ वी (कला) गतवर्षी प्रथम द्रुतीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये प्रथम दहावी क्रमांक कु.श्रेया संजय वर्पे (बारावी)विज्ञान प्रथम क्रमांक कु.समृद्धी साईराम दिघे बारावी कला कु.स्वीटी शंकर नेहे यांचा उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन यावेळी गौरव करण्यात आला.

येथील थापलिंग मित्र मंडळ व ग्रामस्थ दत्तात्रय सोन्याबापु वर्पे यांच्या संयुक्त मदतीने विद्यार्थ्यांना चारशे फुट लांब पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन दिल्याबद्दल त्यांचा देखील यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण दिघे व प्रवरेचे प्राचार्य नानासाहेब देवराव तळेकर यांच्या हस्ते सत्कार करुन आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी थापलिंग मित्र मंडळ व संजय वर्पे  
यांच्या वतीने सर्वांना भोजन देण्यात आले होते मिष्ठान्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!