हिवरगाव पावसा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात

Cityline Media
0
हिवरगाव पावसा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

[देवगड विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद ]

संगमनेर (प्नतिनिधी)तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड माध्यमिक विद्यालयात ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.उगले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.

प्रसंगी विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देवगड विद्यालय येथे विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.देवगड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते धार्मिक व सामाजिक ऐक्य साधणाऱ्या गाण्यांवर नृत्य सादर केले.सांस्कृतिक कार्यक्रमामुळे प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.अनेक ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व खाऊचे वाटप करून कौतुक केले.
या  प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत  सदस्य  गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी पालक,
विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी वृंद विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!