घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत गेलेले दाम्पंत्य पुन्हा एकमेकांच्या प्रेमात

Cityline Media
0
रुपकच्या 'जोडी तुझी माझी'कार्यक्रमात ३०० दाम्पत्यांनी अनुभवला सुखी संसाराचा अफलातून साक्षात्कार.

अहिल्यानगर (प्नतिनिधी) येथे नुकताच "जोडी तुझी  माझी" हा महाराष्ट्रातील एकमेव सायकॉलॉजीकल म्युझिकल कौन्सिलिंग रियालिटी शो यशस्वीपणे पार पडला. यात ३०० दाम्पंत्य सहभागी झाले होते विशेष म्हणजे घटस्फोटाच्या निर्णया पर्यत‌ पोहोचलेले एक दाम्पंत्य‌ पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडले,हिच खरी या कार्यक्रमाची पोचपावती ठरली.
खास पती-पत्नीसाठी तयार करण्यात आलेल्या या अनोख्या कार्यक्रमात एकूण तिनशे पती-पत्नी जोडप्यांनी सहभाग घेतला.अहिल्यानगर येथील प्रसिद्ध संगीत समीक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते सुहास मुळे आयोजित व रुपक कला मंच पुणे प्रस्तुत जोडी तुझी माझी या समुपदेशन कार्यक्रमात कौन्सिलर डॉ.गणेश शिंदे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने मिळालेल्या सुखदायी अनुभवातून सकारात्मक मनपरिवर्तन झाल्याचा आनंद उपस्थितांनी व्यक्त केला.हर्षद रुपवते यांनी निवेदन करुन शोची सुरुवात केली तसेच विषयानुसार व मुद्देसंगत गीते सादर करुन गायक कलाकारांनी यात रंगत वाढवली.कार्यक्रमाच्या यशस्वितेची विशेष पोचपावती म्हणजे घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आलेल्या एका जोडप्याने कार्यक्रम संपन्न होताना यांचा घटस्फोटाचा निर्णय बदलला.समाजातील कौटुंबिक अवस्था पाहता अशा कार्यक्रमांची नितांत आवश्यकता असून संपूर्ण महाराष्ट्रात हा शो आयोजित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत सुहास मुळे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!