वरवंडीची कन्या ज्ञानेश्वरी सखाराम भोसले छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित

Cityline Media
0
वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरवंडी गावातील विद्यार्थिनी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील प्रवरा कन्या मंदिर या ठिकाणी शिक्षण घेत आहे परंतु तिच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेतली गेली आहे  ज्ञानेश्वरीने २०२४ २५ या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता दहावी मध्ये ९७.८ शेकडा गुण मिळवत मुलींमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने देखील कु.ज्ञानेश्वरीस सन्मानित करण्यात आले आहे.
समाज कल्याण विभाग अहिल्यानगर कार्यालयाने तिच्या शैक्षणिक यशाची दखल घेत सर्वोत्तम गुणवंत विद्यार्थिनी म्हणून निवड करत तिला छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करून या पुरस्काराच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीला रोख रक्कम पन्नास हजार व सन्मानपत्र  सन्मानचिन्ह देऊन नुकतेच सन्मानित केले गेले आहे.

ज्ञानेश्वरीने अतिशय जिद्दीने व चिकाटीने मेहनत घेऊन कुठल्याही जास्तीच्या शिकवण्या न लावता स्वअध्ययन करून यश संपादन केले आहे. ज्ञानेश्वरी चे वडील हे सखाराम रतन भोसले हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहे परंतु वडिलांनी आपल्या जीवनात घेतलेली मेहनत या मेहनतीतून त्यांनी संपादन केलेले यश जिद्द व चिकाटी याचा आदर्श या मुली पुढे होता वडिलांच्या पायावर पाय ठेवून मुलीने देखील स्वतःच्या पद्धतीने आणि चिकाटीने मेहनत घेऊन यश संपादन केले.

कुमारी ज्ञानेश्वरीला समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णा हजारे यांच्यामार्फत हिंदवी स्वराज्य ट्रस्ट राळेगणसिद्धी अंतर्गत आई लक्ष्मीबाई  हजारे विद्यार्थीनी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत ज्ञानेश्वरी रोख रक्कम रुपये दहा हजार देऊन गौरविण्यात आले.ज्ञानेश्वरीच्या या यशाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे तसेच आई वडील शिक्षक यांचे देखील कौतुक केले जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!