वरवंडीत दावल मलिक बाबा यात्रा उत्साहात

Cityline Media
0
वरवंडी संपत भोसले संगमनेर साकुर पठार भागातील सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचं समजलं जाणाऱ्या वरवंडी या गावातील दावल मलिक बाबा यात्रोत्सव नुकताच पार पडला.
प्रारंभी किरकोळ स्वरूपात सुरू झालेली यात्रा आज फळा फुलाला आली असल्याचे समाधान वरवंडी पंचक्रोशीतील भाविकांनी व्यक्त केले.प्रसंगी यात्रेमध्ये हजारो भाविकांनी गर्दी करत आपली लक्षणीय उपस्थिती दर्शवली. 

यात्रेची सकाळच्या आरतीने झाली सायंकाळी सहा वाजता यात्रेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली दावल मालिक बाबांचा पांढरा घोडा मानाचा मानला जातो अशाच पांढऱ्या घोड्याच्या पदर स्पर्शाने मिरवणुकीला सुरुवात झाली दुःखी व्याधीग्रस्त भाविकांनी आत्मीयतेने मिरवणुकी मध्ये सहभाग घेऊन येथे शोभा वाढविली.

 मिरवणूक संपल्यानंतर सर्व भाविक आरतीमध्ये मंत्रमुक्त झाले यानंतर भाऊसाहेब चिमाजी काळे व रावसाहेब चिमाजी काळे यांनी दिलेल्या भोजनाचा भाविकांनी लाभ घेतला या यात्रेची व्याप्ती पाहता भाविकांमध्ये उत्साह दिसत होता पुढील पाच वर्षांच्या अन्नदानाचे देखील नियोजन झालेले आहे पुढील वर्षी अन्नदानाची जबाबदारी श्रीरंग गबाजी पाटोळे यांनी स्विकारली यानंतर यात्रा कमिटीने ठेवण्यात आलेला कार्यक्रम महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका सौ.गीता शिंदे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडला.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता कुस्ती शौकिनांनी कुस्त्यांचा आनंद घेतला.शेवटी यात्रा कमिटीकडून ग्रामस्थांचे सर्व भाविकांचे आभार मानण्यात आले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!