सिटीलाईन न्यूज ब्लॉगर वृत्ताची दखल;इगतपुरीच्या भोंदू मायलेकीवर जादूटोणा गुन्हा दाखल

Cityline Media
0
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला

नाशिक दिनकर गायकवाड नाशिकच्या सिन्नर तालुक्यातून महाराष्ट्राचा एफस्टीन उदयास आल्यानंतर अनेक भोंदूनी पुरावे नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली होती त्यात इगतपुरीच्या तळेगाव येथील भोंदू मायलेकींनी हायप्रोफाईल महिला आणि इतर सामान्य महिलांना घोळत घेऊन जादूटोणा आणि लोकांचे नशिब बदलण्याचा अक्षरशःधंदा उभारला होता याबाबत येथील पिडीत महिला वंदना गोसावी,सामाजिक कार्यकर्ते योगेश जगताप पत्रकार दिनकर गायकवाड यांनी या भोंदू मायलेकींवर गुन्हा दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलिसांना तक्रार निवेदन दिले होते याबाबत सिटीलाईन न्यूज वेब न्यूज ब्लॉगर हे वृत्त प्रकाशित केले होते पोलिसांनी या वृत्ताचे दखल घेत नुकतेच या भोंदू मायलेकीवर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घडलेल्या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की इगतपुरी येथील फिर्यादी महिला रवींद्र गोसावी (४०) रा दत्तनगर गिरणारे यांच्या नात्यागोत्यातील रत्ना माळी (वय ५२) 
हि आरोपी महिला वंदना गोसावी यांना नाशकातील एका भेटीत म्हणाली की माझी मुलगी वैशाली किशोर बैरागी (३३) भुतबाधा नशिब बदलणे देवाचं करते आमच्या कडे भरपूर लोक समस्या घेऊन येतात तेव्हा आरोपी महिला गोसावी पती पत्नीस म्हणाली की तुम्हाला भूतबाधा झाली आहे.

 मग त्या देवलासी महिलांनी वेळोवेळी रकमा घेत भुतबाधाचा उपचार सुरू केला पण त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने वंदना गोसावी यांनी त्यांच्याकडे पैसे मागायला सुरुवात केली.यावर भोंदू महिलांनी अश्लील शिवीगाळ करून पैसे देण्यास नकार दिला आणि अघोरी विद्येचा भाग दाखवून पोबारा केला अखेर पिडित महिला वंदना गोसावी नाशकातील सामाजिक कार्यकर्ते योगेश जगताप पत्रकार दिनकर गायकवाड यांना भेटून सविस्तर हकिकत सांगितली.

त्यांनी या घटनेची पार्श्वभूमी इगतपुरी पोलिसांना तक्रार निवेदनाद्वारे कळविली या पार्श्वभूमीचे वृत्त सर्वप्रथम सिटीलाईन न्यूज ब्लॉगरला प्रकाशित होताच पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत इगतपुरीच्या तळेगाव येथील भोंदू महिला वैशाली किशोर बैरागी व रत्ना माळी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८,भारतीय संहिता कलम ३५१(२) भारतीय न्याय संहिता कलम ३५२ भारतीय न्याय संहिता ३(५)महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढी तपास इगतपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!