“५० दिवस – ५० सराव परीक्षा” ठरल्या यशाच्या पायऱ्या!
सोनगाव प्रतिनिधी नियोजनबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मोठी भरारी घेऊ शकतात,हे सात्रळ येथील ओम साई क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या एमएचटी–सीईटी परीक्षेत पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.
“५० दिवस – ५० सराव परीक्षा” या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत क्लासेससह पालकांच्या आनंदात भर घातली आहे.यंदाच्या परीक्षेत विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुणवत्ता संपादन केली.
कु.सारा आझाद शेख हिने पीसीबी गटात ९७.६० टक्के श्रेणी तर पीसीएममध्ये ९२.३९ टक्के श्रेणी मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.कु.सायली रमेश शिंदे हिने पीसीबीमध्ये ९६.०९ व पीसीएममध्ये ९२.४० टक्के श्रेणी,प्राजक्त प्रविण अंत्रे याने पीसीएममध्ये ९६.०२ टक्के श्रेणी,तर कु.संस्कृती अनिल पर्वत हिने ९३.९५ टक्के श्रेणी मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली.
यशराज भारत शिंदे (९२.१८), कु.साक्षी गाडेकर (९०.४५), कु.गायत्री बाळासाहेब पठारे (८९.१८), कु.ईश्वरी पोपट सरोदे (८८.१९), सार्थक वाबळे (८७.४४), तनिषा रामकृष्ण शिंदे – पीसीबी (८९.१४), प्रतीक्षा भाऊराव शिंदे (८०.७०), अथर्व शिवाजी वाघचौरे (८४.८७), कु.कीर्ती दिघे – पीसीबी (८१.००), कु.आरती काळोखे (८५.६५), आकांक्षा गोरक्षनाथ अनाप (८०.९७) आणि यश गलांडे – पीसीबी (८०.७५) यांनीही उल्लेखनीय गुणवत्ता संपादन करत संस्थेच्या यशात भर घातली.
या यशामागे “५० दिवस – ५० सराव परीक्षा” हा उपक्रम निर्णायक ठरल्याचे क्लासेसचे संचालक प्रा. महेश अनाप यांनी सांगितले. नियमित सराव परीक्षा, वेळेचे अचूक नियोजन, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि विद्यार्थ्यांशी सातत्यपूर्ण संवाद यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या या यशात प्रा.सोनाली अनाप,प्रा. विनायक लाळे, प्रा. बाबासाहेब पारखे,प्रा.सुवर्णा वारुळे,प्रा.समृद्धी दिघे, प्रा.अर्चना प्रधान आणि प्रा.श्रुती वालझाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प यापुढेही कायम ठेवणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
-ओम साई क्लासेसचा यशाचा मंत्र :
✓ ५० दिवस सातत्यपूर्ण सराव परीक्षा
✓ वेळ व्यवस्थापनावर भर
✓ प्रत्येक विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद
✓ विषयनिहाय विश्लेषण आणि सुधारणा
