जांबुत बुद्रुकच्या दाम्पत्यांवर गुन्हा दाखल
जाबुंत प्नतिनिधी अंगणात चरणाऱ्या शेजाऱ्यांच्या १५ ते २० कोंबड्यांना कसले तरी विषारी औषध टाकुन मारणाऱ्या दाम्पंत्याविरुद्ध नुकताच संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने माणसांच्या भांडणामुळे निष्पाप पक्षांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला.
संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असुन गावकरी आरोपी दाम्पत्यांच्या या कृत्यावर खेद व्यक्त करीत आहे.फिर्यादी शेतकरी प्रकाश गुलाब देवकाते (वय ३७) यांच्या शेतातील रस्त्याचा वाद गावात सर्वश्रुत आहे.
प्रकाश देवकाते यांना सायंकाळी जेव्हा कोंबड्या खुराड्यात आलेल्या दिसल्या नाही तेथे त्यांनी शेजारी राहणाऱ्या महेंद्र सत्तू कुलाळ (वय ३५)राधिका महेंद्र कुलाळ (वय ३०) यांच्या घराकडे गेले असता त्यावेळी प्रकाश देवकाते यांच्या कोंबड्या महेंद्र कुलाळ आणि राधिका कुलाळ या दाम्पत्यांच्या अंगणात मेलेल्या अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या.
त्यावेळी प्रकाश देवकाते यांनी मेलेल्या कोंबड्यांना हातात घेऊन पाहिले असता त्यांना कुलाळ दाम्पत्यांनी काहीतरी विषारी औषध खाऊ घातल्याचा संशय आला.रस्त्या भांडणाचा राग मनात धरून खोडसाळपणे कुलाळ दाम्पत्यांनी कोंबड्यांना मारले.
असा संशय व्यक्त करत प्रकाश देवकाते पुढे म्हणाले की माझ्याकडे असणाऱ्या जनावरांना देखील या आरोपी लोकांनी विष घातले तर त्या जनावरांचा देखील असाच मृत्यू होईल.पुढे माझ्या जनावरांना माझ्या कुटुंबातील सदस्यांना विषबाधा झाली तर महेंद्र सतु कुलाळ,राधिका महेंद्र कुलाळ ठका मारुती कुलाळ,किशोर सतु कुलाळ व सतु हरी कुलाळ हे लोक जबाबदार राहतील.
घारगाव पोलिस ठाण्यात आरोपी महेंद्र सतु कुलाळ (वय ३५) राधिका महेंद्र कुलाळ (वय ३०) यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घारगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी करीत आहे.
