आबा निर्मळ निर्मित,प्रमोद निर्मळ दिग्दर्शित उंबरठ्या पलीकडे शार्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव ग्रामीण भागातील वेगळे उदाहरण दाखवून देणारे आणि युट्यूब वरील मनोरंजन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे,निर्माता आबा निर्मळ आणि दिग्दर्शक प्रमोद निर्मळ यांची हृदयस्पर्शी मराठी शॉर्ट फिल्म "उंबरठ्यापलीकडे" नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे.
मराठी शॉर्ट फिल्म क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि सामाजिक आशयाच्या कलाकृती देणारे निर्माता आबा निर्मळ आणि दिग्दर्शक प्रमोद निर्मळ पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी कथा घेऊन आले आहेत.मनीषा गुळवे यांच्या संकल्पनेतून साकारलेली "उंबरठ्यापलीकडे" ही मराठी शॉर्ट फिल्म नुकतीच   एन व्हिजन फिल्म या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाली आहे.
एका आईचा संघर्ष, नशिबाने दिलेले असंख्य घाव, समाजाकडून होणारा मानसिक छळ अशा अनेक भावनिक पैलूंवर ही शॉर्ट फिल्म प्रकाश टाकते.ग्रामीण संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच हेलावून सोडणारी ठरेल यात शंका नाही.प्रेक्षकांनी एन. पी.व्हिजन फिल्म या युट्यूब चॅनेलवर ही शॉर्ट फिल्म आवर्जून पहावी.असे आवाहन निर्माता दिग्दर्शक यांनी केले.या फिल्मच्या पोस्टर अनावरण प्रसंगी रिलस्टार ज्ञानेश्वर निबे, पत्रकार.महेश भोसले ,रावसाहेब पर्वत, उत्तम पारखे, गोपाळ राऊत,राजेंद्र मते,उबाळे, श्रीपाद बोकंद,गणेश बोकंद, वनिता निर्मळ,पत्रकार रूपाली भालेराव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी फिल्मचे निर्माता, दिग्दर्शक आबा निर्मळ, प्रमोद निर्मळ कलाकार. ज्ञानेश्वर साबळे  यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण कार्यक्रम पार पडला ते हॉटेल तात्याचे संचालक किरण राऊत,शुभांगी राऊत, ओम सोनवणे,कैलास सोनवणे,गीतांजली सोनवणे यांची देखील उपस्थिती होती.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!