गोदावरी पुरामुळे उद्भवणाऱ्या समस्येमुळे वंचितचे निफाडच्या लोकप्रतिनिधीस निवेदन

Cityline Media
0
चांदोरी-सायखेडा पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

नाशिक दिनकर गायकवाड निफाड तालुक्यातील चांदोरी,सायखेडा व परिसरातील गावांना दरवर्षी गोदावरी नदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याने या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी नुकतेच निफाड विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनीधीना वंचित बहुजन आघाडी,निफाड तालुका तसेच चांदोरी व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात चांदोरीतील गणेशनगरसह पूरग्रस्त भागातील नाल्यांचे खोलीकरण,संरक्षण भिंती उभारणे, नांदूर-मधमेश्वर धरण व गोदावरी नदीपात्रातील गाळ तातडीने काढणे, सायखेडा पुलाचे रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करणे, पूरग्रस्त नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई देणे तसेच चांदोरी-सायखेडा परिसरासाठी दीर्घकालीन पूर संरक्षण आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते धर्मा जाधव,निफाड तालुका अध्यक्ष सचिन हिरे, निफाड तालुका उपाध्यक्ष गणेश गांगुर्डे,निफाड तालुका सदस्य अजय आवचिते,पिंपळगाव शहराध्यक्ष विवेक गांगुर्डे, रितेश गवई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!