नाशिक जिल्हा सचिव म्हणून सौ.योजना नामदेव भगत यांची निवड
नाशिक:(दिनकर गायकवाड येथील पँथर क्रांतीवीर जनरल कामगार सेना श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याचा ऐतिहासिक सोहळा २ एप्रिल २०२५ रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला.
या भव्य सोहळ्यात महिला आघाडी जिल्हाप्रमुख तसेच इतर महत्त्वाच्या पदांची औपचारिक नियुक्ती करण्यात आली. या उल्लेखनीय सोहळ्यात नाशिक जिल्हा महिला आघाडी प्रमुख म्हणून सौ.संवीता मल्हारी खैरनार यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष विजय साहेबराव वाहुळे यांच्या हस्ते करण्यात आली.
तसेच नाशिक जिल्हा सचिव म्हणून सौ.योजना नामदेव भगत यांनाही संस्थापक अध्यक्ष विजय साहेबराव वाहुळे यांच्या हस्ते जबाबदारी प्रदान करण्यात आली या ऐतिहासिक प्रसंगी नाशिक जिल्हा सचिव पवन खांडरे यांसह अनेक कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते.या नियुक्ती सोहळ्यात उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याने सामाजिक न्याय,श्रमिक हक्क आणि क्रांतीच्या ज्वालेला जिवंत ठेवण्याचे संकल्प व्यक्त केले.
ज्या वेळी लोक एकत्र येतात,त्या वेळी क्रांतीला थांबवणं अशक्य असतं.हि भावना पँथर क्रांतीवीर जनरल कामगार सेना श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा उचलून धरली आहे,जेणेकरून संघर्षाची ज्वाला अधिक तेजीत पेटवली जाईल.असा कल पदाधिकारी कार्यकर्त्यांचा यावेळी दिसून येत होता. विजयी पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे