श्रीरामपूर (दिपक कदम) सालाबाद प्रमाणे याही वर्षी तालुक्यातील गोंडेगाव मध्ये मोठे उत्सवाच्या वातावरणामध्ये येडू आईची जत्रा नुकतीच पार पडली यंदाही मोठ्या संख्येने महिला मंडळ व गावकरी उपस्थित होते.
याही वर्षी उत्सवाच्या आनंदामध्ये नवतरुण असे दोन गट पाहण्यास मिळाले सागर बर्डे मित्र मंडळ व शंतनु फोपसे मित्र मंडळ असे दोन मित्र मंडळ मोठ्यां जल्लोषात आणि उत्साहात येडूआईची जत्रा पार पाडली यावेळेस श्रीरामपूर तालुका पोलिसांचे मोठे योगदान व होमगार्ड यांचे सहकार्य देखील लाभले त्यामुळे येडुआईची जत्रा शांतता पार पडली येणारे सर्व भाविकांचे आभार लोकनियुक्त सरपंच सागर बर्डे व शंतनु फोपसे यांनी मानले