संगमनेर (प्रतिनिधी) आय बी.पी.एस.कृषी क्षेत्र अधिकारी केंद्र शासन (गट अ पंजाब नॅशनल बँक)या पदी तालुक्यातील मेंढवण येथील कु.प्रतिक्षा योगेश काळे हिची नुकतीच निवड करण्यात आली.
प्रतिक्षा हि ज्ञानमाता विद्यालय व जुनियर कॉलेजची इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची विद्यार्थिनी असून तिच्या जिद्द चिकाटी आणि आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे तिने शाहू महाराज कृषी विद्यालय कोल्हापूर या ठिकाणी बीएससी ॲग्री ही पदवी मिळविली त्यानंतर तिने त्याच कॉलेजमध्ये विविध पुरस्कारही पटकावले आहेत.ज्ञानमाता विद्यालयातून विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नेहमीच केले जाते याचा फायदा तिला तिच्या या जडणघडणीमध्ये झालेला आहे त्याचप्रमाणे ज्ञानमाता विद्यालयात दहावीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारी हि विद्यार्थिनी आहे मेंढवण दुष्काळग्रस्त गाव असूनही आपल्या बुद्धीच्या व चिकाटीच्या जोरावर तिने आई-वडिलांचे,ज्ञानमाता विद्यालयाचे नाव उंचावले.प्रसंगी ज्ञानमाता विद्यालयचे प्राचार्य फादर फ्रान्सिस पटेकर पर्यवेक्षक फादर प्रशांत शहाराव उपप्राचार्यी सौ.अर्चना डोंगरे व ज्येष्ठ शिक्षिका सौ.शारदा नवले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिच्या यशाबद्दल तिचे व पालकांचे अभिनंदन केले आहे तर मेंढवण पंचक्रोशीत देखील तिचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.