सिटीलाईन न्यूज नेटवर्क
वर्धा (प्रतिनिधी) येथील भाजपाचे माजी खासदार रामदास तडस हे सोवळे नेसले नाही तसेच जानवे नसल्याने त्यांना देवळीतील राम मंदिर गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले.नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही,बाहेर निघा असे पुजाऱ्यांनी बजावल्याने तडस संतापले.या घटनेने निश्चितच वाईट वाटले. पुजारी अडून बसल्याने वाद टाळला,असे तडस यांनी स्पष्ट केले.
गावात रामनवमीनिमित्त तडस दाम्पंत्य आणि येथील पुजारी कुटुंब पिढीजात आहे.पण सध्या पुजारी पुणे येथे स्थायिक असून केवळ रामनवमीस येतात.जुने मंदिर असल्याने आमची आस्था आहे.हे सोवळेओवळे काय लावले ? तुम्ही एक दिवसासाठी येता आणि नियम सांगता हे बरे नव्हे असे यावेळी रामदास तडस म्हणाले