कळसूबाई शिखरावरील रोप-वे नाशिक हद्दीत गेल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Cityline Media
0

बारी, जहागीरदारवाडी, पेंडशेत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा इशारा

कळसुबाई शिखरावरूनच रोपवे करा, अन्यथा आंदोलन करणार

अकोले (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात समुद्र सपाटीपासून सर्वोच्च शिखर असलेले कळसूबाई शिखरावर रोप-वे करण्याचे काम केंद्र व राज्य शासनाच्या पर्वतमाला योजनेंतर्गत विचाराधीन आहे. मात्र,अकोले तालुक्याच्या हद्दीबाहेरील काही लोकांकडून हा रोपवे करण्याचे प्रयत्न होत आहे.अकोले तालुका हदी बाहेरून रोप-वे नेण्याचे प्रयत्न करून आमचे रोजगार हिरावण्याचे प्रयत्न आम्ही अजिबातच सहन करणार नाही. याउलट तसे होणारच असेल,तर आम्ही कळसूबाई शिखरावर कोणत्याच परिस्थितीत रोप-वे होऊच देणार नाही,असा इशारा कळसूबाई शिखराखालील बारी व जांहगिरदारवाडी ग्रामस्थांनी नुकताच दिला.
केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्वतमाला योजनेतून देशात ३२० रोप-वे मंजूर केले आहेत. यामध्ये अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखरावरील नियोजित रोप-वे चा समावेश आहे.हा रोप-वे नाशिक जिल्ह्याच्या बाजूने करण्याचा घाट घातला जात आहे.कळसुबाई शिखराचे पायथ्याशी बारी,जाहगिरदारवाडी गाव असून कळसूबाई शिखर या शिवारात अंतर्भूत आहे. याबाबतीत आपली भूमिका स्पष्ट

रोपवे झाल्यास स्थानिक व पर्यटकांना लाभ
कळसूबाई शिखर येथे स्थानिक तरुणांनी प्रशिक्षण घेऊन रेस्क्यूटिम तयार केली आहे. ही टिम पर्यटकांना अपघात अथवा काही त्रास होऊ लागल्यास मदतीस तयार असते. यावेळी अनेकदा त्रास होऊ लागल्यास पर्यटकांना झोळी करून खाली आणावे लागते. मात्र रोप-वे झाल्यास या कामात मोठी मदत होऊन रोपवेमुळे अपघातग्रस्त पर्यटकाला रोपवेमुळे तत्काळ खाली आणता येईल,वेळ वाचून वेळेत औषधोपचारासाठी रुग्णालयात नेता येईल,हाही एक रोप-वेचा फायदा असल्याचे खाडे यांनी सांगितले.

करण्यासाठी नुकतेच जहागीरदारवाडी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले.येथील सरपंच व ग्रामस्थानी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करताना आपल्या शिवाराशिवाय इतरत्र ठिकाणांहून रोप-वे नेण्यास तिव्र विरोध दर्शविला.यावेळी जहागीरदारवाडीचे सरपंच पंढरीनाथ खाडे व उपसरपंच रुक्मिणी खाडे, बारी गावचे सरपंच वैशाली खाडे व उपसरपंच गणेश खाडे, ग्रामपंचायत सदस्य भाऊ खाडे, सुनीता खाडे, त्रिंबक खाडे, दामू खाडे 

कळसुआई आदिवासी समाजाची निसर्ग देवता
आमच्या आदिवासीची निसर्ग देवता कळसुआई आहे. गेल्या अनेक पिढ्या देवीची सेवा करत आहोत. परंपरेनुसार आमचे बारी-जाहगिरदारवाडी-पेंडसेत ही ग्रुप ग्रामपंचायत कळसूबाई मंदिराची सेवा करत आहे. आम्ही वर मंदिर परिसरात आदिवासी चित्रकला सजावट करत असतो. आम्ही २५-३० वर्षांपासून येथे येत असल्याचे म्हणून वाद घालण्याचा प्रयत्न करतात. मात्र आम्ही पर्यटक, गियर्यारोहक महणून त्यांचा सन्मान राखतो,अन्यथा हे सहन करणार नाही,असेही खाडे यांनी सांगितले.

रवींद्र खोडे, गोविंद खाडे, भाऊराव खाडे, जनार्दन कचरे, प्रवीण खाडे, येशू खाडे, संतोष खाडे, गोविंद दराणे, साहेबराव भारमल, किसन खाडे, कैलास खाडे, योगीराज खाडे उपस्थित होते.

पंढरीनाथ खाडे म्हणाले, कोरोनानंतरच्या काळात कळसूबाई शिखरावर पर्यटक व गिर्यारोहकांचे येण्याच्या प्रमाणात वाढ झाली. त्यांना सोयी सुविधा देताना स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध झाले. त्यासाठी गावक-यांनी मोठ्या प्रमाणात

कळसुबाई शिखर
सोईसुविधा पुरविण्यात येतात.अनेक पिढ्यापासून आदिवासींची निसर्ग देवता कळसूबाई आहे.त्यामुळे पूर्वीपासूनच बारी,जाहगिरदारवाडी व पेंडशेत ग्रुप ग्रामपंचायतकडून त्या सर्वांची व मंदीराची सेवा करणे आमचा हक्क आहे.या इंटरनेटच्या काळात काही जण तो हिरावून घेऊ पहात आहेत.निसर्ग देवता कळसूबाईला गालबोट लागू नये म्हणून आम्ही देखील मंदिर परिसरात आदिवासी वारली चित्रकलेने सजावट करतो. नवरात्रोत्सव, शनिवार व रविवार विकेन्ड काळात भाविक व पर्यटकांची येथे मोठी गर्दी होते. गर्दीचे नियोजन स्थानिक नागरिक करतात. कळसूबाई शिखर चढाई ६ किमीची आहे. या रस्त्यात गियविहक व पर्यटकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, नाष्टा व जेवणाचे स्टॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शिखरावरील भागातही सुविधा पुरवण्यात येत आहेत.आमच्या गावांतील तरुणांना यातूनच रोजगार उपलब्ध होतो. या मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण होणे व चढताना मध्यभागी असलेले जुनाट शिडीचे नूतनीकरण होणे आवश्यक आहे. हा लोखंडी जीना खूप जुना असून तो नवीन बनवण्यासाठी वन व पर्यटक विभागाने निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!