बंद घराची खिडकी तोडून मनमाडच्या डमरे कॉलनीत धाडसी चोरी

Cityline Media
0
मनमाडच्या डमरे कॉलनीत चोरीने नागरिकांत भीतीचे वातावरण

नाशिक दिनकर गायकवाड 
नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या सत्रात आणखी एका घटनेची भर पडली आहे.त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.शहरातील कॅम्प भागातील डमरे कॉलनी येथील एका बंद घराची खिड़की तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारच्या मध्यरात्री घडली. गेल्या महिन्याभरात या परिसरातील ही चौथी चोरी असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डमरे कॉलनीत राहणारे मुर्तुजा रस्सीवाला हे काही दिवसांपासून बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराची खिडकी तोडून घरात प्रवेश केला, घरातील कपाटे व पलंग उघडून सर्व सामान अस्ताव्यस्त करण्यात आले. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने व रोख रकम लंपास करण्यात आली.

चोरी गेलेल्या वस्तूंचा व रकमेचा नेमका तपशील मिळालेला नसून ती माहिती घेण्याचे काम सुरू आहे. शहरात या चोरीबाबत चर्चेला उधाण आले असून चोरी गेलेल्या दागिन्यांची व रोख रकमेची सक्रम मोठी असण्याची शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत मनमाड पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञ यांना घटनास्थळी

पाचारण करण्यात आले असून, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान सततच्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून परिसरात गस्त वाढवावी तसेच चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!