नाशिक दिनकर गायकवाड- पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या संतश्रेष्ठ निवृतीनाथ महाराज यांच्या पालखीचा दुसरा मुकाम काल सातपूर गावात झाल्याने येथील भाविकांत चैतन्य निर्माण झाले.
त्र्यंबकेवरहून प्रस्थान केलेल्या या पालखीचे स्वागत करण्यासाठी सातपूर ग्रामस्थांनी एक महिना आधीच तयारी सुरू केली होती. सातपूरमध्ये पालखी स्वागत समितीची स्थापना करण्यात आली.यामध्धो अध्यक्ष निलेश भंदुरे, कार्याध्यक्ष सुनील बिले, नितीन निगळ, गोकुळ निगळ, विजय भंदुरे, शांताराम निगळ, अमर काळे, माजी नगरसेविका सीमा निगळ, तुकाराम बंदावने योग्यासह अनेक ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता.
मारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. स्वागतापासून भोजन,निवार, स्नान,शौचालय, पिण्याचे
पाणी, चहा-नाश्ता अशा सर्व व्यवस्था करण्यात आल्या
काल सकाळी येथील नर्सरी ते सातपूर गाव दरम्यान बँडपथकासह स्वागत यात्रा काढण्यात आली. संत निवृतीनाथ महाराज पालखीचा पहिला मुक्काम जवळपास १५० वर्षापासून सातपूर गावात होत आहे. यामुळे सातपूर ग्रामस्थांसाठी ही परंपरा अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद आहे.
यंदाच्या वर्षी दिंडीच्या स्वागतासाठी विशेष बाब म्हणजे, जनता विद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी भाजी मंडई या प्रथमच स्वागत व्यवस्थेत समावेश करण्यात आला होता. पावसाच्या पार्श्वभूमीवर जनता विद्यालयात वाहन पार्किंगची तर भाजी मंडईत वारकऱ्यांसाठी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती.
