नाशिक दिनकर गायकवाड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व
दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत 'कार्यानुभव संधी व ऑन द जॉब ट्रेनिंग' कार्यशाळा पार पडली.
अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सुरेश डोखळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक प्रवीण जाधव, संचालक रवींद्र देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. डी. एम. कारे यांनी सांगितले की,
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत सुरू झालेल्या पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या 'ऑन-द-जॉब ट्रेनिंग तसेच कार्यानुभव संधी या विषयांची विद्यार्थ्यांना ओळख होणे आवश्यक आहे. त्यामुळेच विद्यार्थी आणि उद्योजक यांच्यामध्येसमन्वयस्क म्हणून महाविद्यालय कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शशिकांत जाधव यांच्या बीजभाषणाने कार्यशाळेची सुरुवात झाली. नवीनतम योजना, कल्पकता,मार्केटिंग फंडा, लहान व कमी भांडवलातून सुरुवात, सकारात्मक ऊर्जा व विचार, स्व-अनुभवातून दैनंदिन गरजा ओळखून सुचलेले उद्योग या सर्व बाबींवर विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.' सुला वाईन यार्ड'चे सहाय्यक व्यवस्थापक उत्कर्ष सानप यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना 'आत्मविश्वासाने आपल्यातील गुण हेरून ध्येय निश्चित करावेच त्या ध्येय पूर्ततेसाठी वाटचाल करावी' हा महत्वपूर्ण संदेश दिला.
सुरेश डोखळे यांनी आपल्यातील वेगळेपणा आपल्याला वेगळा मार्ग दाखवतो तो ओळखा 'असा मोलाचा सल्ला दिला. उद्योजकीय सल्लागार डॉ. निलेश जाधव यांनी नकारात्मक गोष्टींचा विचार न करता कल्पकतेच्या जोराबर उद्योग सुरू करण्याचा मूलमंत्र दिला. कादवा कारखान्याचे विक्रांत सावंत व सोयगावचे प्राचार्य डॉ. हिरामण क्षीररसागर यांनी प्रात्यक्षिक बाबींवर भर दिला. सूत्रसंचालन डॉ. विकास शिंदे यांनी केले तर आभार अजित मेधने यांनी मानले.
