खामगावातील घटना; गाय चोरल्याचा होता संशय
बुलढाणा सिटीलाईन न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील खामगाव कथित गोरक्षक आणि गावगुंडांनी गाय चोरीच्या संशयावरून एका बौद्ध तरुणाचे अपहरण आणि अर्धनग्न करून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना खामगाव शहरात शुक्रवारी रात्री घडली. दलित संघटनांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला असून सोमवारी खामगाव बंदची हाक दिली आहे.दरम्यान, पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली तर एकजण पसार आहे.खामगाव बसस्थानक परिसरातून शुक्रवारी रात्री रोहन पैठणकर वय २४) या तरुणाचे अपहरण करण्यात आले. त्याला जवळच्याच मैदानात नेऊन जबर मारहाण करण्यात आली. यावेळी त्याला त्याचा धर्म व जात विचारण्यात आली. एवढेच नाही तर विवस्त्र करून त्याचे गायींसोबत फोटो व व्हिडीओही काढण्यात आले. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी त्याला पुन्हा दुसऱ्या एका ठिकाणी नेले. तिथेही मारहाण करण्यात आली. पण त्याचवेळी गस्तीवर असलेले पोलिस आले. त्यामुळे तरुणाचे प्राण वाचले. या घटनेत पीडित तरुणाचा एक डोळा निकामी झाला असून,
हल्लेखोरांनी तरुणाला धर्म विचारला, गाय चोर आहेस असे म्हणत मारहाण केली. धर्म तपासण्यासाठी अर्धनग्न करण्यात आले. पीडित तरुणावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी एकप्रकारे अतिरेकीच आहेत. त्यांनी धर्म विचारून मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी.अन्यथा राज्यभरात पडसाद उमटतील. जनावरांच्या नावाखाली माणसांना मारणाऱ्या या प्रवृत्तीला ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.असे ऑल इंडिया पँथर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार म्हणाले
बौद्ध नाकाचेही हाड मोडले आहे. या तरुणाला गाय चोरल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गब्बू गूजरीवाल, प्रशांत गोपाल संगेले, रोहित पगारीया सर्व रा.खामगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
