श्रीरामपूर प्नतिनिधी राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरप्रकार उघडीस आलेला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी बनावट वैद्यकीय कागदपत्रे तयार करून तर काहींनी भ्रष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांना व दलांना हाताशी धरून आर्थिक देवाण घेवाणीतून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले आहे.अशा दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे स्वतःला दिव्यांग सादर करून शासनाच्या इच्छित आणि दिव्यांग कोट्यातील नोकऱ्या मिळविल्या आहेत यात सर्वाधिक शिक्षकी पेशाने काळीमा फासलेली असुन श्रेणी-१ अधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्य सेवक भरतीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याचे सिद्ध झाले आहे. त्या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आधार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण खडके यांनी श्रीरामपूरचे मुख्याधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना आपल्या मागणीचे निवेदन देऊन केली आहे.
शासनाच्या वतीने दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत दरमहा आर्थिक स्वरूपात मानधन दिले जाते.तर ग्रामपंचायत,नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था मार्फतही राखीव निधीतून लाभ दिला जातो.परंतु बोगस दिव्यांग याही सवलतींचा व योजनांचा लाभ घेत असून खऱ्या दिव्यांगावर मोठा अन्याय करीत असल्याचे उघडीस आलेले आहे. त्यामुळे अशा दिव्यांग प्रमाणपत्रांची जिल्हा वैद्यकीय रुग्णालयामार्फत सखोल चौकशी होऊन प्राप्त दिव्यांग प्रमाणपत्रे ही वैद्यकीय दरबारी खरोखर नोंदणीकृत आहेत का? वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करूनच चाचण्या करून सदर प्रमाणपत्र प्रदान केलेले आहे का? तसेच संशयित दिव्यांग प्रमाणपत्र धारक याची फेर वैद्यकीय तपासणी होऊन खरोखर दिव्यांग असल्याची खातरजमा व्हावी.यासाठी अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था श्रीरामपूर तसेच आधार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण गोरखनाथ खडके यांचे मार्गदर्शनाखाली व राज्य संपर्कप्रमुख राम डमाळे यांचे वतीने तहसीलदार श्रीरामपूर तसेच प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर भाग आणि मुख्याधिकारी श्रीरामपूर नगरपरिषद श्रीरामपूर यांना पत्र देऊन सर्व प्राप्त दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी होऊन चौकशीअंति बोगस दिव्यांग लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करावे. अशी मागणी केलेली आहे. तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक लाभार्थी आढळून आल्यास संघटनेकडे अथवा संबंधित शासकीय यंत्रणेकडे तात्काळ माहिती देण्याचे आवाहन संस्था संघटना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण गोरखनाथ खडके यांनी केले आहे.