पालकमंत्र्यांच्या आदेशाने तहसिलदार धिरज मांजरे यांची विशेष कारवाई
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द–दाढ खुर्द मार्गावरील वाल्हेकर वस्तीचा तब्बल २० वर्षांपासून बंद असलेला रस्ता अखेर खुला झाला आहे.दोन दशकांपासून रखडलेल्या या प्रश्नामुळे पाच कुटुंबांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेवटी जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पा.यांच्या हस्तक्षेपानंतर तहसिलदार धिरज मांजरे यांनी तातडीने कारवाई करत ग्रामस्थांना दिलासा दिला.
गावच्या सरपंच सौ.अलका गायकवाड,उपसरपंच बाबा भवर, ग्रा.प. सदस्य संजय भोसले,सोपान सोनवणे, सागर भडकवाड, सेवा सोसायटीचे संचालक दत्ता गायकवाड, दुध संस्थेचे अध्यक्ष मकरंद गुणे, कैलास गायकवाड, दिलीप मांढरे अविनाश सोनवणे संदिप सोनवणे
सावकार लावरे रामा क्षिरसागर अनिल सोनवणे आदींसह ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नासाठी सातत्याने प्रयत्न केले. मंत्री डॉ. विखे पा. यांचे स्वीय सहायक बापुसाहेब गायकवाड, विखे पा. कारखान्याचे संचालक ॲड. अनिल भोसले जनसेवा कार्यालयाचे
सुजित क्षीरसागर दिपक सोनवणे मनोज मेहरे यांच्या पाठपुराव्यामुळे तहसिलदार मांजरे यांनी महसूल विभागाच्या संपूर्ण यंत्रणेसह स्थळाला भेट देत पोलिस बंदोबस्तात रस्ता तात्काळ खुला केला काटेरी झाडे काढून, खड्डे बुजवून मुरुमीकरण करत आणि पंचनामा करून रस्त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
या संदर्भात निवृत्ती वााल्हेकर व इतर पाच जणांनी सुमारे २० वर्षा पूर्वी तहसिलदार यांच्याकडे अर्ज दाखल केला होता व निकालही लागलामात्र निर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती.
प्रसंगी मंडल अधिकारी जे.एन. पठाण, ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब बोऱ्हाडे, सोमनाथ गाडेकर, सुजित साबळे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलिस अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील पाणंद व वहीवाटीचे रस्ते खुले करण्याचा घेतलेला निर्णय या कार्यवाहीला पूरक ठरल्याचे स्पष्ट झाले.
दोन दशकांपासून रखडलेला हा ऐतिहासिक रस्त्याचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वांनी मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पा., तहसिलदार धिरज मांजरे, महसूल विभागाचे अधिकारी, सरपंच तसेच जनसेवा कार्यालयाची कृतज्ञता व्यक्त केली.