अहिल्यानगर जिल्हा आणि राज्यातून अनेक आदिवासी बांधवांचा भाजपमध्ये प्रवेश
संगमनेर विशाल वाकचौरे देशाचे पंतप्रधान:नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीस व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष: रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरातील हिंदुत्ववादी नेतृत्व,आदिवासी नेते:योगेश सूर्यवंशी यांचा नुकताच भाजपमध्ये जाहीर प्रवेश मुंबई झाला मुंबई प्रदेश कार्यालयात आदिवासी बंधू- भगिनींच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत पार पडला.
योगेश सूर्यवंशी यांनी गेल्या १५ वर्षांत हिंदुत्ववादी नेतृत्व करून अनेक आदिवासी बांधवांचे धर्मांतर रोखले.त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अनेक आंदोलने, चळवळी यात सहभाग घेऊन आपली आक्रमक भूमिका मांडली आहे.सामाजिक कार्य करत असतांना त्यांनी आता भाजपमध्ये सक्रिय काम करण्यासाठी मुंबई येथे जाहीर प्रवेश केला आहे.
प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,राज्य संघटन महामंत्री: विक्रांत पाटील, प्रदेश कार्यालय प्रभारी: रवी अनासपुरे, शेतकरी मोर्चा प्रदेश संयोजक:राहुल भोसले, भाजपचे नवनाथ बन,भाजपा युवा मोर्चा मा.अध्यक्ष:दिपेश ताटकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी नेते योगेश सूर्यवंशी तसेच त्यांच्या बरोबर सौ.अर्चना बर्डे, राहुल दळवी, सोमनाथ माळी, अमोल बर्डे, सुरेश बर्डे, संजय बर्डे, रवींद्र पिंपळे, राकेश माळी, प्रशांत दळवी,अमोल रनाते,सुनील वाघ, विकास शिंदे, ऋषिकेश रुपवते, रुपेश धाकतोडे आदींसह अनेक आदिवासी बंधू -भगिनींच्या मोठ्या संख्येने प्रवेश झाला.
या प्रवेशामुळे आगामी काळात जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीत आदिवासी समाजात भाजपची पकड आणखी मजबूत होणार असून, पक्ष संघटनाला नवीन उर्जा व बळ मिळेल,असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.