संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील ज्येष्ठ नागरिक कालकथित संपत विश्राम भालेराव (वय ८४)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुपारी निधन झाले त्यांचा अंत्यसंस्कार विधी आज २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता हिवरगाव पावसा अमरधाम येथे होणार आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, सरपंच सुभाष गडाख,भाजपाचे जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे,विविध कार्यकरी सोसायटीचे संचालक अशोक भालेराव,
सरपंच सेवा संघाचे नेते बाबासाहेब पावसे,
ग्रामसेवक हरिष गडाख,भाजपाचे तालुका सरचिटणीस गणेश दवंगे,शिवसेना शिंदे मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भालेराव,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,प्रा.बाबुराव पावसे,सामाजिक कार्यकर्ते केशव दवंगे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांच्या सह इतर मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
कालकथित संपत विश्राम भालेराव यांच्या पाश्चात दोन मुले मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे
चंद्रकांत संपत भालेराव सूर्यकांत संपत भालेराव जयश्री रंगनाथ घायवट यांनी शोक व्यक्त केला.
