हिवरगाव पावसा येथे शालेय साहित्याचे वाटप पावसे कुटुंबीयांची आदर्श सामाजिक बांधिलकी
संगमनेर नितीनचंद्र भालेराव एकीकडे देशात जात वास्तव तीव्र आहे.धर्म द्वेष वाढीस लागलेला आहे.अशा परिस्थितीत समाजात आदर्श प्रस्थापित करणारी एक प्रेरणादायी घटना हिवरगाव पावसा येथे घडली.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावातील बुद्ध विहारात मराठा समाजातील पावसे कुटुंबीयांनी आपल्या मुलीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला आहे.कु.पिऊ पावसे हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे,खाऊचे वाटप स्नेह भोजनाचे आयोजन
करण्यात आले.
भगवान बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.राजकीय, सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अनोखा सामाजिक बांधिलकी जपणारा वाढदिवस साजरा झाला.
हिवरगाव पावसा गावामध्ये मोठी बौद्ध वस्ती आहे.गावात सुंदर असे बौद्ध विहार आहे.
विहारात दर रविवारी सायंकाळी बालसंस्कार वर्गाचे आयोजन केले जाते.लहान लहान बालके,
विद्यार्थी तालासुरात बुद्ध वंदना म्हणतात,पाठांतर करतात. या बालसंस्कार वर्गास अनेक समाज बांधव मोठी मदत करतात तसेच मान्यवर,दानशूर व्यक्ती खाऊ आणि शैक्षणिक साहित्याची मदत करत आहेत.त्या अनुषंगाने राजर्षी महंत एकनाथ महाराज यांच्या कुटुंबीयांनी कु.पिऊ पावसे हिचा वाढदिवस बुद्ध विहारात साजरा करण्याचा निर्णय घेतला. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत केली.सामाजिक सलोखा,बंधू भावाचा,
समतेचा नवा आदर्श पायंडा निर्माण केला आहे.
हिवरगाव पावसा या गावात एक अनोखी सामाजिक अभिसरणाची प्रसंग घडलाय.जात धर्माचे अडसर बाजूला सारत गावातील गावकरी,सर्व समाज बांधव एकत्र येत बुद्ध वंदना घेत वाढदिवस साजरा करण्याची ही घटना खरोखर उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहे.
प्रसंगी शिवसेना (शिंदे) तालुकाध्यक्ष रमेश काळे यांनी पिऊ पावसे विद्यार्थिनीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना पावसे कुटुंबियांच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले आणि या उपक्रमापासून इतरांनी आदर्श व प्रेरणा घ्यावी तसेच समाजातील इतरांनी पावसे कुटुंबीयांप्रमाणे बुद्ध विहारात वाढदिवस साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तर राजर्षी महंत एकनाथ महाराज म्हणाले की कृष्णाच्या भक्तीने जीवनाची सुरुवात केल्यामुळे हृदयात राम प्रकट होतो,तर बुद्धांची भक्ती केल्याने शेवटी मोक्ष प्राप्त होतो हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे.हे सर्वांगीण सत्य उपस्थित समोर मांडले आणि कु.पिऊ पावसे शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच सुभाष गडाख,
भाजपाचे जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे,ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे,भाजपाचे तालुका सरचिटणीस गणेश दवंगे,
शिवसेना शिंदे मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भालेराव,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,भाऊसाहेब जाधव,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साहात साजरा झाला.तसेच शाहीर मधुकर भालेराव यांच्या गाण्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ भालेराव,बाळासाहेब भालेराव,गणेश दवंगे,सोमनाथ दवंगे,साई भालेराव,पंकज भालेराव,मुकेश दरोळे,यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्थानी प्रयत्न केले.
