संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संगमनेर तालुक्यातील हिवगाव पाऊस (देवगड)येथील श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) येथे चंपाषष्ठी उत्सव सोहळ्याचे आयोजन बुधवार दि. २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.गावातील प्राचीन खंडोबा मंदिर असलेल्या देवगड येथे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान आयोजित चंपाषष्ठी उत्सव-२०२५ ची ''येळकोट येळकोट,जय मल्हार''च्या जयघोषात हर्षोल्हासात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात सुरूवात होत आहे.
श्री खंडोबा देवस्थानच्या चंपाषष्टी महोत्सवाची ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे.
२६ नोव्हेंबर रोजी प्रातःकाल पहाटे ५ ते ७ वाजता श्रींचे मंगलस्नानने उत्सवात सुरुवात होईल.७ ते ७.३०वा.
काठीपालखी सजावट,८ ते १० वा. ग्रामदैवत हनुमान मंदिर दर्शन व पारंपारिक सवाद्य ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक,१० ते ११ वा. हळदी सोहळा,सायं ५ वा. श्री खंडोबा यांचा लग्नसोहळा मोठा उत्साहात पार पडणार आहे. त्यानंतर सायं ५.३० वा. महाआरती होईल.
महोत्सव काळात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यंदाही मोठ्या उत्साहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून भाविकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा.हिवरगाव पावसा पंचक्रोशीतील नागरिक व खंडोबा भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजल्यापासून महाप्रसादास सुरुवात होईल.
तसेच सर्व भाविक भक्तांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या चंपाषष्ठी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट, समस्त हिवरगांव पावसा ग्रामस्थ यांनी केले आहे.
