काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा चाकू हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

Cityline Media
0
अकोला सिटीलाईन न्यूज नेटवर्क काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर नुकताच जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहाळा गावात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला केला होता.राजकीय आणि  कौटूंबिक वादातून उबेद पटेल या तरूणाने हिदायत पटेल यांच्यावर  हल्ला केल्याची माहिती समोर आली बी होती.

हल्ल्यानंतर मारेकरी फरार असून संशयित आरोपी उबेद पटेलला रात्री पणज गावातील  लोकांनी पकडून दिले आहे.अशातच अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हिदायत पटेल यांनी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी काही राजकीय वर्तुळातील नेत्यांची नावे समोर आली आहेत.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचे नाव समोर आले आहे. संशयितांमध्ये मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेस नेते अन् जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांच्या नावाचा समावेश आहे. 

अकोट ग्रामीण पोलिसांत ५ आरोपींवर पटेल कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय हल्लेखोर आरोपी उबेद पटेल आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.अकोट ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हिदायत पटेल हे नुकतेच दुपारच्या दोन वाजेच्या नमाजनंतर मोहाळा गावातील मशिदीत नमाज पठणानंतर बाहेर येत असताना उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकूने हल्ला केला.पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर वार केले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या
हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मात्र हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र अखेर उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

हिंदायत पटेल हे विद्यमान प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष असून, अकोल्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. पटेल यांनी सन २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते. तसेच पटेल २०१४ मध्ये दुसऱ्या स्थानावर. तर २०१९ मध्ये तिसऱ्या स्थानावर होते. हिदायत पटेल हे जिल्ह्यातील मोठे सहकार नेते म्हणून ओळखले जात. गेल्या २५ वर्षांपासून ते जिल्हा बँक संचालक, अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तसेच ३५ वर्षांपासून जिल्ह्यातील महत्त्वाच्या अकोट बाजार समितीचे ते माजी सभापती आणि सध्या संचालक होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!