२०१८ ला झालेल्या भिमा कोरेगाव दंगल प्रकरणी चौकशी आयोगाने केली पाहणी

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड २०१८ साली पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथे दोन समाजात तेढ निर्माण  करुन जात्यांध मानसिकतेतून दंगल घडविली होती.पुर्ण भारतभर या घटनेचे पडसाद उमटले होते.या प्रकरणी चौकशी आयोग स्थापन करण्यात आला होता.नुकतेच चौकशी आयोगाने घटना ठिकाणी जाऊन चौकशी केली.
प्रसंगी आयोगाचे अध्यक्ष कलकत्ता न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश डॉ.जयनारायण पटेल व महाराष्ट्र राज्याचे माजी.मुख्य सचिव सुमित मलिक आयोगाचे कामकाजासाठी या ठिकाणाच्या चौकशीसाठी छत्रपती संभाजी महाराज समाधी,गोविंद गोपाळ महार यांची समाधी,भैरवनाथ मंदिर,कोरेगावभिमा जयस्तंभ येथे गेले होते प्रसंगी आयोगात आंबेडकरी समाजाचे वकील ॲड किरण चन्ने,अॕड.बी.जी.बनसोडे,अॕड.राहूल मखरे ऐतिहासिक घटना स्थळ पाहणीसाठी कोरेगाव भिमा येथे चौकशी आयोगासोबत गेले होते.तसेच कोरेगावभिमा चौकशी आयोगाचे मुख्य साक्षीदार रविंद्र चंदने देखील यावेळी उपस्थित होते

२०१८ सालपासून कोरेगावभिमा चौकशी आयोगाचे काम सातत्याने चालू आहे आणि अॕड.किरण चन्ने , अॕड.बी.जी.बनसोडे ,अॕड.राहूल मखरे हे आंबेडकरी समाजाचे वकिल सातत्याने अभ्यासपुर्ण रित्या आयोगात पिडितांची बाजू मांडत आहेत अशी माहिती अॕड.अमोल बबनराव वानखेडे यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!