नाशकात ३ अपघातात ३ जखमी

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत.
घडलेल्या घटनेतील अपघाताचा पहिला प्रकार पंचवटीत घडला. फिर्यादी संतोष राजाराम झाल्टे (रा. सरदार चौक, पंचवटी) हे मजुरीचे काम करतात. दि. ८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुतोंड्या मारूतीच्या समोरील मैदानाजवळ एमएच १५ जेडी ५६७९ या क्रमांकाच्या कारवरील चालकाने फिर्यादीच्या अंगावर वाहन घालून त्यांना फरपटत घेऊन जात अपघात केला.

त्यात झाल्टे यांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी चारचाकी वाहनाच्या चालकाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार आहिरे करीत आहेत.
अपघाताचा दुसरा प्रकार मुंबई-आग्रा महामार्गावर घडला. फिर्यादी गाव संतोष अश्रूबा केसकर (रा. आडगाव शिवार, नाशिक) यांची आई सरस्वती डबल केसकर (वय ६५) या राहत्या घराकडून जत्रा चौक येथे भाजीपाला घेण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी सर्व्हिस रोडवर नाशिकहून ओझरकडे

जाणाऱ्या रोडवर लक्ष्मीनारायण लॉन्ससमोर एमएच १५ केएच ५५०२ या क्रमांकाच्या बुलेट मोटारसायकलीवरील अनोळखी चालकाने फिर्यादीच्या आईला समोरून ठोस देऊन अपघात केला. यात सरस्वती केसकर यांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात बुलेटच्या स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

अपघाताचा दुसरा प्रकार वडाळा नाका येथे घडला. फिर्यादी महंमद चरार सलीम शेख (रा. प्राईड पॅराडाईज, नाशिकरोड) व त्यांचा चुलतभाऊ मुबस्सिर आसिफ शेख हे दोघे जण एमएच १५ एचएल ४२७४ या क्रमांकाच्या मोपेडने मुंबई नाका सर्कलकडून वडाळा नाक्याकडे जात होते. त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या एमएच १५ केएल २८२२ या क्रमांकाच्या मोटारसायकलीवरील चालकाने फिर्यादीच्या मोपेडला कट मारला. त्यामुळे फिर्यादीची गाडी खाली पडली. त्यात त्यांच्या हातापायाला दुखापत झाली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात मोटार सायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार म्हैसपुणे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!