नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महापालिकेच्या उप महापौर पदाच्या निवडीवरुन शिवसेना पक्षात नाराज होऊन नगरसेवक प्रविण तिदमे यांनी महानगरप्रमुख पदाचा आणि नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करुन नॉट रिचेबल झाले होते.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
नुकतीच तिदमे यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी सांगितले की, मी नाराज होऊन नॉट रिचेबल झालो नव्हतो.उपमहापौरपदाची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना पदाधिकारी,समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. त्यांच्या भावना तीव्र होत्या.
सतत फोनवर आणि घरी गर्दी करून प्रत्येक जण हेच विचारात होते की,आपले काय चुकले?,आपण कुठे कमी पडलो ? सर्वांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मी नॉट रिचेबल झालो होतो.माझ्याशी संपर्क होत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे,शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या कुटुंबियांशी संपर्क साधला.
स्वतःएकनाथ शिंदे यांनी तिदमे यांच्यावर अन्याय होणार नाही,त्याला तातडीने माझ्याशी संपर्क करायला सांगण्याचा निरोप कुटुंबियांना दिला.एकनाथ शिंदे यांनी सांगितले की,मी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त होतो, त्यामुळे उप महापौर पदाबाबतचे लेखी पत्र नाशिकला पाठविण्यात आले नाही.
तुझ्यावर कोणताही अन्याय होणार नाही. तू मला भेटल्याशिवाय चुकीचा निर्णय घेऊ नकोस असे स्पष्ट आदेश दिले.तुझ्यावर आणि अन्य नगरसेवकांवर अन्याय होणार नाही असे स्पष्ट त्यांनी सांगितले. त्यामुळे,एकनाथ शिंदे यांचा आदेश आणि जनभावनेचा आदर करत मी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला असून आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत आमच्या काही मागण्या आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहोत,असे त्यांनी सांगितले.
