संभाजीनगर श्रीपाद बोकंद छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक जवळ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग शहानूरवाडी या गजबजलेल्या वसाहतीत रात्री नऊ वाजल्यानंतर कोपऱ्यांच्या बाजूला असलेले पथदिवे बंद आहेत तसेच त्या परिसरात पोलीसांची असलेली गस्त काही दिवसांपासून बंद झाल्याने येथे भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढलेला आहे.
या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून पोलिसांचा चोरांवर कोणताही वचक राहिला नाही असे चित्र निर्माण झाले आहे.पोलिस अधिकारी याकडे लक्ष देतील का?असा प्रश्न विचारला जात आहे या कारणांमुळे परिसरातील नागरिक कोणाकडे दाद मागतील तरी या बाबीचा विचार होणे तितकेच गरजेचे बनत चालले आहे.
या परिसरात पोलिसांकडून सतर्कतेचे वातावरण निर्माण करावे व परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी येथील त्रस्त नागरिकांकडून होत आहे रेल्वे पुलाखालून शहाणूरवाडी परिसर सार्वजनिक बांधकाम विभाग वसाहत ते एमआयटी कॉलेजपर्यंत परिसरातील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे तरी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावी व तेथील सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली जात आहे
