पाणी फाउंडेशनच्या सह संस्थापिका किरण राव यांची आदर्श गाव मांजरसुबा भेट

Cityline Media
0
झरेकाठी वार्ताहर सोमनाथ डोळे जिल्ह्यातील अनेक गावात उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मोठी पायपीट करावी लागत होती.मात्र,पाणी फाउंडेशनच्या  विविध जलसंधारण  उपक्रमांमुळे गावातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली असून आज गाव सुजलाम-सुफलाम बनले आहे.शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची उपलब्धता वाढली असून उत्पादनातही वाढ झाली आहे.पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून व गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि श्रमदानातून उभ्या राहिलेल्या विकासकामांचे कौतुक करत भविष्यातही जलसंवर्धन व शेतकरी गट ही चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन पाणी फाउंडेशनच्या सहसंस्थापिका किरण राव यांनी केले आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे आमिर खान यांच्या पत्नी आणि पाणी फाउंडेशनच्या  सह संस्थापिका किरण राव यांनी सदिच्छा भेट देत गावातील विविध विकासकामांची पाहणी केली.त्यांच्या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते

गावकऱ्यांनी जलसंधारणामुळे झालेल्या बदलांची दिली माहिती यावेळी किरण राव यांनी गावात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या जलसंधारण, शेती विकास आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित उपक्रमांची माहिती घेतली.

पाणी फाउंडेशन,कृषी विभाग व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या शेतकरी गटाबाबत मार्गदर्शन केले.तसेच शिवछत्रपती शेतकरी समूह गट, गर्वगिरी महिला शेतकरी गट,निप्ती येथील राम रहीम शेतकरी संघ, व गुप्ता येथील संभाजी राजे शेतकरी गट,तसेच शिव महिला शेतकरी गटाच्या कामकाजाची पाहणी करून सदस्यांशी संवाद साधला.

गावकऱ्यांनी जलसंधारणामुळे झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती त्यांना दिली.
भेटीदरम्यान आदर्श गावच्या सरपंच रूपाली कदम,उपसरपंच जालिंदर कदम, ग्रामसेवक सारिका वाळुंज,सहाय्यक कृषी अधिकारी सुविधा वाणी, पाणी फाउंडेशनचे समन्वयक विक्रम पाठक, ग्रामस्थ विलास भुतकर, योगेश कदम नामदेव कदम, किरण कदम, प्रदीप कदम, बाळासाहेब कदम, बजरंग वरखडे,अर्चना कदम, छाया कदम यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी गावाच्या विकासाचा प्रवास आणि पाणी फाउंडेशनच्या योगदानाबद्दल माहिती दिली.
-भविष्यातही जलसंवर्धन व शेतकरी गट चळवळ अधिक बळकट व्हावी : किरण राव
गर्भगिरीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले मांजरसुंबा हे गाव एकेकाळी तीव्र पाणी टंचाईने ग्रस्त होते. उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मोठी पायपीट करावी लागत होती. मात्र, पाणी फाउंडेशनच्या विविध जलसंधारण उपक्रमांमुळे गावातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली असून आज गाव सुजलाम-सुफलाम बनले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची उपलब्धता वाढली असून उत्पादनातही वाढ झाली आहे.


किरण राव यांनी गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि श्रमदानातून उभ्या राहिलेल्या विकासकामांचे कौतुक करत भविष्यातही जलसंवर्धन शेतकरी गट ही चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. त्यांच्या भेटीमुळे गावाच्या विकासाला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. जालिंदर कदम,रंजन कदम आदि शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!