मित्रांच्या संगणमतातून मतीन महेमुद शेख याचा मृत्यु
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे २०० रूपये किरकोळ उसनवारी मुळे युवकांच्या हाणामारीत मध्ये येथील मतीन महेमुद शेख मृत्यु या युवकाचा मृत्यू झाला असुन घटना घडलेल्या नंतर २४ तासाच्या आत आश्वी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे व कर्मचाऱ्यांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी बिलकिस उर्फ शाकीरा महेमुद शेख वय ५५ वर्ष रा उंबरी बाळापुर रोड,आश्वी बुद्रुक यांनी दिलेल्या फिर्यादे नुसार सविस्तर वृत्त असे की, मयत मुलगा मतीन महेमुद शेख याचा मित्र आरोपी नंबर १ आसीफ सलीम शेख रा.आश्वी बुद्रुक, यांना फोन करून सांगितले की, मतीन याचे पाठित खिळा लागला तुम्ही सगळे प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे या.फिर्यादी यांने दवाखान्यात गेल्यावर मतीन याला विचारले की, तुझ्या पाठीत खिळा कोणी भोकसला त्यावर मतीन यांनी सांगीतले की,पाटबंधारे बंगल्या जवळ प्रतापपुर रस्ता,आश्वी बुद्रुक येथील महादेव मंदिर येथे बसलेलो असतांना आरोपी नं २,३,४ हे माझ्याशी झटपट करत होते. त्यांनी मतीन यांचे हातपाय पकडुन ठेवले होते तसेच उसनवारी दिलेले २०० रूपये मी व आरोपी नंबर १ च्या वडीलाकडे मागण्यासाठी गेल्याचा राग मनात धरूण आरोपी नंबर १ ने माला पाठी मध्ये खिळा भोकसुन जख्मी केले.
प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे प्राथमिक उपचार करून डॉक्टराच्या सल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील ससुन रूग्णालयात गेलो असता उपचारा दरम्यान दि ९ ऑगस्ट रोजी मतीन याचा मृत्यु झाला.याप्रकरणी फियार्दीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नंबर १-आसीफ सलीम शेख रा.आश्वी बुद्रुक, २. सोहेल आंधळे (पुर्ण नाव माहित नाही) रा.प्रतापपुर, ३. पप्पु भांड (पुर्ण नाव माहित नाही) रा.आश्वी बुद्रुक ४.गौतम गायकवाड, (पुर्ण नाव माहित नाही) रा.आश्वी बुद्रुक ता संगमनेर यांनी संगणमत करून जिव मारून टाकले आहे.
अनेकदा आश्वी परीसरामध्ये अवैध रित्या गांजा विक्री होत असल्याची कुणकुण होती.आश्वी बुद्रुक येथील महादेव मंदिर परीसर,ताजणे मळा येथील वसंत बंधारा आश्वी बुद्रुक तसेच आश्वी खुर्द कट्टा अनेकदा गाजा पिणारे असल्याचे काही स्थानिकांनी पोलीसांना सांगितले होते असे असतांना पोलिसाच्या हायगय आणि निष्काळजी भुमिकेमुळे तसेच अवैध रित्या दारू तसेच गांजा विक्रित्यावर राजकीय वरद हस्त असल्यामुळे पोलीस प्रशासन देखील कोणतीही कारवाई करत नव्हते. जर या टोळक्यांवर कारवाई झाली असती तर आज मतीनचा जीव गेला नसता.गांजा तस्करी सोबतच आश्वी परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात नशा आणणाऱ्या प्रदार्थाचे विक्री होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.पोलिसांनी तत्काळ अवैध्य रित्या दारू व गांजा तसेच आम्ली प्रदार्था विक्रेतावर करवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.
घटनास्थाळी रात्री उशीरा संगमनेर उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी भेट दिली. रात्री गुन्हा दाखत होत नसल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृत मतीन यांचा मृतदेह पोलीस ठाणे समोर आणून ठेवला होता.घटनेचा पुढील तपास पोलीस निरक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक बर्डे करत आहे