अकराव्या शतकातील शिवमंदिराला क दर्जाची भाविक भक्त व पर्यटकांची मागणी
आश्वी संजय गायकवाड महादेव हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे दैवत आहे त्याला रुद्र,भोलेनाथ अशा अनेक नावांनी ओळखले जाते भाविक भक्त म्हणजे देवावर श्रद्धा ठेवणारा माणूस आणि मेळा म्हणजे मोठी गर्दी किंवा जत्रा अर्थात शिवलिंगाच्या दर्शनासाठी लोकांनी भक्ती भावाने केलेली आराधना अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या निमगावजाळी गावच्या उत्तरेला असणारं दुधेश्वर हे एक प्राचीन शिवस्थानाची महती अशीच येथे स्वयंभु शिवलिंग असुन जुनी लोक कथा सांगते की पुर्वी ऐथे एका गवळीने गाय चारताना येथे दुधाची धार गळताना पाहिली त्या ठिकाणी शिवलिंग प्रकट झाले म्हणुन याला दुधेश्वर असे नाव पडले या डोंगरावर शांत प्रसन्न व स्वच्छ वातावरण असल्यामुळे मंदिर परिसरात पुन्हा पुन्हा यावे वाटते मंदिर छोटे परंतु स्वच्छ व नित्य पुजा अर्चा सुरू राहाते
श्रावण महिन्यात विशेष पुजा अभिषेक केले जातात तर महाशिवरात्रीला येथे रात्रभर जागरण भजन व अभिषेक केला जातो.
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्यामुळे ट्रेकर्स पर्यंटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असुन शुद्ध हवेमुळे सकाळी दर्शनास गेलेल्या भाविकांना चांगले अनुभव येतात संगमनेर लोणी श्रीरामपुर नेवासा राहुरी आश्वी साकुर कोल्हार राहाता तळेगाव दिघे कोपरगाव चाळीस क्रोशीतील तसेच नासिक जिल्यातील तरुणांना या दुधेश्वर डोंगराने मोहीनीत पाडले आहे ते सह्याद्री पर्वतरांगेची उपरांग असणाऱ्या कळसूबाईच्या डोंगररांगेत वसले आहे. अनेक भाविक भक्त तर तिथे भेटी देतातच परंतु ट्रेकर्स, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांचीही तिथं सतत रेलचेल असते.
निमगाव जाळी गावातुन या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता असुन वाहने थेट डोंगर पायथ्याशी जातात त्यांनंतर सुमारे पंचवीस मिनिटात डोंगर चढुन मंदिर गाठता येते
सध्या पावसाळ्याचे दिवस व श्रावण महिन्यामुळे हिरवळ व धुक्याने हा डोंगर खुप नयनरम्य दिसतो जणू हिरवा शालू नेसलेल्या नववधू सारखा.
सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची १९६ वी पुण्यतिथीचे औचित्य साधून दुधेश्वर इथं माहितीचा नीलफलक लावण्यात आला. गावातील इतिहास अभ्यासक डॉ. विजय वदक आणि सुमित डेंगळे यांच्या संकल्पनेतून हा माहिती फलक लावण्यात आला असून त्यासाठीचं सौजन्य आणि आर्थिक सहकार्य गावातील गोविंदा उद्योगसमूहाचं होतं.
"कोरोना काळापासून दुधेश्वरला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. लोणी, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यांतून लोक इथे भेटी देत असतात,दर्शन घेतात त्याला कारण म्हणजे दुधेश्वर हे महादेवाचं स्थान तर आहेच परंतु परिसरातील ते सर्वात उंच शिखर असून कळसूबाईच्या डोंगररांगेतलं शेवटचं ठिकाण आहे. त्याच्या पूर्वेला डोंगर नाहीत. तसचं अलीकडे ट्रेकिंगचं महत्त्वही वाढलं आहे. हल्ली काही व्हीलॅागर्स यूट्यूबर सोशल मिडीया मुळे या ठिकाणचा जास्त प्रचार प्रसार झाला,सोशल मिडियावर त्यावर प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित होऊ लागले आहे त्यामुळे या परिसरातील लोकांची पावलं आपसूक या ठिकाणाकडे वळताना दिसत आहे.
येथे निमगाव जाळी लोहारे या रस्त्याच्या मध्या पासुन गडाकडे जाण्यास योग्य रस्ता आहे
- नील फलकामुळे ११व्या शतकातील वारसा जतन
आता नीलफलकाच्या माध्यमातून अकराव्या शतकात उल्लेख आढळणाऱ्या या प्राचीन ठिकाणचा वारसा जतन केला जाणार आहे.त्याविषयी अधिकाधिक जनजागृती होईल.
सुमित डेंगळे इतिहास संशोधक
- सरकारने दुधेश्वरला 'क' वर्ग दर्जा द्यावा
सरकारनं दुधेश्वरला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यायला हवा. त्याचा विकास झाल्यास एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून ते विकसित होईल"
डॉ.विजय वदक
- प्रत्येक पर्यटक,भाविक परिक्रमाने दीर्घायुष्यी
कौलाघात धकाधकीच्या जिवनात व्यायाम करण्यास चांगली जागा नाही त्यामुळे या दुधेश्वर डोंगराकडे श्रध्दा व पर्यटन म्हणुन बघितले आणि नित्य गड पायी सर केला तर आरोग्य सर्वोत्तम राहील यात तिळमात्र शंका नाही.
सिताराम चांडे जेष्ठ पत्रकार