संगमनेर रामनाथ बोऱ्हाडे तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कसारे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पूजा गोरक्षनाथ नाईक यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
मावळते उपसरपंच सौ.सविता कार्ले यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शनिवार (दि. ९ )रोजी दुपारी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व ग्रामसेवक यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली.यावेळी उपसरपंच पदासाठी पुजा गोरक्ष नाईक यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने नाईक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यांना सूचक म्हणून वनिता कृष्णाजी कार्ले यांनी स्वाक्षरी केलीउपसरपंच पदी निवड होताच फटाक्यांच्या आतषबाजीत पुजा नाईक यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी गोरक्ष नाईक,बाळासाहेब नाईक,गणपत कार्ले ,शिवाजीराव कोल्हे, दामू जोंधळे, शिवाजी कार्ले ,गायकवाड वाल्मिक,संदीप कार्ले अध्यक्ष इद्रभान गाढे ,शामराव नाईक, राजू नाईक, सुनील नाईक, चंदू कार्ले विश्वनाथ कार्ले,भाऊसाहेब सोनवणे, नवनाथ कार्ले, बाळासाहेब गाढे ,दशरथ बोरकर !ऋषी गांडोळे ,वाल्मीक गाढे, अविनाश बोरकर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
पुजा गोरक्ष नाईक यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्बल राज्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे जिल्हा परिषद सदस्य महेद्र गोडगे यांनी आभिनंदन केले या निवडीचे नाईक यांचे कसारे गावातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.