आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील शिबलापुर संगमनेर या रस्त्यावर धावणाऱ्या मोटरसायकल टाटा झीपचा अपघातात नाशिक येथील एका महिलेचा मृत्यु तर जण एक गंभीर जखमी झाला.
शिबलापुर संगमनेर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याचा सुमारास शेडगाव शिवारात शेडगाव फाट्यावर हिरो कंपनीची मोटरसायकल टाटा झीप यांचा अपघातात मोटरसायकल वरील सौ.अलका भाऊसाहेब भाबड राहणार चास नळवाडी नाशिक (वय ४५) यांचा अपघात स्थळी जागीच मृत्यु झाला तर भाउसाहेब नारायण भाबड (वय ५१) हे गंभीर जखमी झाले आहे या वेळी अपघातातील गंभीर जखमीस उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .