डी पॉल स्टेट बोर्ड हायस्कूल मध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा उत्साहात

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम येथील विन्सेन्शन मिशन सर्व्हिस सोसायटी,संचलित डी.पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये इ.पाचवी ते दहावीतील विद्यार्थी मतदान प्रक्रियेनुसार नुकताच विद्यार्थी कार्यकारिणी पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीरामपूर डी.पॉल शाखेचे व्यवस्थापक प्राचार्य फादर एबी होते. तसेच उपस्थित प्रशासक  फा.फ्रँको,प्राचार्या सिस्टर ब्लेसा,समन्वयक सि.लिम्ना यांच्या हस्ते सेंट डी.पॉल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी फा.एबी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. दरम्यान,सिनियर स्कूल हेड बॉय कृष्णा देविदास गोरे,हेड गर्ल श्रुती संदीप गुंजाळ,जूनियर हेड बॉय वेदांत प्रदीप तागड,हेड गर्ल गौरवी प्रशांत तोडमल तसेच सिनियर व जूनियर स्पोर्ट्स लीडर,हाऊस कॅप्टन,प्रिफेक्ट या पदी विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रसंगी त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बॅचेस लावून गौरविण्यात आले.दरम्यान सन्मानित विद्यार्थ्यांनी संचलन करून शाळेबद्दल एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.तसेच गतवर्षीचे हेड बॉय दर्श शितलकुमार झांजरी व हेड गर्ल मिसबा अबुबकर शेख यांनी शाळेबद्दल कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमास श्रीरामपूर डी.पॉल शाखेचे व्यवस्थापक प्राचार्य फादर एबी,प्रशासक फा.फ्रँको,प्राचार्या सिस्टर ब्लेसा, समन्वयक सि.लिम्ना,सचिव मोली कुथूर,वरिष्ठ लिपिक रवींद्र लोंढे, तंत्रस्नेही गणेश पवार, कलाशिक्षक विकास वाघमारे,क्रीडा शिक्षक संदीप निबे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक अपिल आल्हाट,सूत्रसंचालन मोली कुथूर यांनी केले,तर आभार एलिझाबेथ वाकडे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!