इगतपुरीतील तळेगाव येथील जादूटोणा करणाऱ्या मायलेकींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Cityline Media
0
जादूटोण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह अन्य व्यक्तींची चौकशी

नाशिक दिनकर गायकवाड इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे हाय प्रोफाईल आणि सामान्य महिलांना नशीब बदलण्याचे आमिष गंडवणाऱ्या मायलेकीवर जादूटोणा अंतर्गत नुकताच गुन्हा दाखल झाला होता.गुन्हा दाखल होऊनही पोलीस कारवाई करण्यास चालढकल करत होते.परंतु इगतपूरी येथील निरीक्षक सारिका आहिरराव यांनी सुत्रे हाती घेतली आणि नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ह्या ब्रीद वाक्यास साजेल अशी धडक कारवाई केली.
इगतपुरी पोलीस ठाणे हद्धीतील पिडीत महिला सौ.वंदना रविंद्रगोसावी (वय ४०)वर्षे. रा. गिरणारे ही आजारी होती. संशयित आरोपी वैशाली किशोर बैरागी व रत्ना माळी रा. अष्टविनायक अपार्टमेंट, तळेगांव रोड, इगतपुरी ह्या देव पुजा करून आजारातुन बरे करतात अशी माहिती मिळाल्याने त्यांच्याकडे जाऊन तिला होत असलेल्या त्रासाबद्धल माहिती दिली.

आरोपी महिलांनी तिला सांगितले की, तुझ्यावर बाहेरची बाधा झाली असुन तुला तुझे नातेवाईकांनी करणी केली आहे.ह्या आजारातुन मुक्त करण्यासाठी पुजा विधी करावी लागेल.जर तु तसे नाही केले तर तुझे बरे वाईट होईल.असे भासवून तिला भिती घालुन फिर्यादी महिलेकडुन पुजा विधीच्या नावाने ५५ हजार रूपये घेवुन फसवणुक केली.

तिला पुजा करूनही आजारपणापासुन फरक न पडल्याने फिर्यादीने आरोपी महिलांकडे पैशाची मागणी केली.त्यामुळे आरोपी महिलांनी तिला शिवीगाळ केली.तिच्यावर जादूटोणा करून तिचे शरीर सडवुन टाकण्याची धमकी दिली. म्हणून संशयित आरोपी वैशाली किशोर बैरागी व रत्ना माळी यांच्याविरूध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. का. कलम. ३१८,३५१ (२), ३५२,३ (५) व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन कायदा २०१३ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ह्या गुन्हयातील आरोपी महिला व किशोर काशीदास बैरागी वय ४८, राहुल आसाराम पाटील वय ३७ रा. अष्टविनायक अपार्टमेंट, तळेगांव रोड, इगतपुरी यांच्या मदतीने अंधश्रध्देकामी जादुटोण्याकरीता वापरण्यात येणारी जडीबुटी, गंडेदोरे,माळा, नारळे व तत्सम साहित्य साधने हे शेजार राहणारे मयुर धनशाम भराडे वय २९, रा. अष्टविनायक अपार्टमेंट, तळेगांव रोड, इगतपुरी याचे घरात ठेवले असल्याचे सांगितले.

ह्या ठिकाणी जावुन गुन्ह्यात वापरण्यात येणारे जादुटोणा व पुजा विधीचे साहित्य साधने जप्त करण्यात आले.आरोपींना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजणे,अमोल गायधनी,हवालदार निलेश देवराज,दीपक मोरे,भावनाथ, विजय रुद्रे, महेंद्र गवळी करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!