टोपी टॉवेलच्या प्रथेला फाटा देत समाजसेवेचा आदर्श; सिन्नर मध्ये अनोखा विवाह सोहळा!

Cityline Media
0
अभिजीत जोशी–श्रुती यांच्या विवाहात वनप्रस्थ फाउंडेशनला ११ हजारांची देणगी

सिन्नर दिनकर गायकवाड तालुक्यात सामाजिक बांधिलकी आणि विधायक विचारांचा आदर्श निर्माण करणारा एक आगळावेगळा विवाह सोहळा रविवारी पार पडला. विधिज्ञ  श्रीपाद मधुकर जोशी यांचे चिरंजीव अभिजीत जोशी आणि श्रुती यांचा विवाह पारंपरिक थाटात पार पडला या विवाहाचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे टॉवेल-टोपीसारख्या पारंपरिक सत्काराच्या प्रथांना फाटा देत समाजोपयोगी उपक्रमाला प्राधान्य देण्यात आले.
विवाह सोहळ्यानिमित्त वनप्रस्थ फाउंडेशनला ११ हजार रुपये देणगी स्वरूपात देण्यात आली.त्यामुळे आनंदाचा क्षण केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक कार्याला हातभार लावण्याचा संदेश जोशी कुटुंबीयांनी दिला.

अभिजीत जोशी हे बी.इ सिव्हिल तसेच वकिलीचे शिक्षण घेतलेले असून,वधू श्रुती यांनी इंटेरिएल डिझाईन (बी.डेस) शिक्षण घेतले आहे. दोन्ही कुटुंबीय, नातेवाईक,मित्रपरिवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा सिन्नर-शिर्डी महामार्गावरील ज्वालामाता लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

आजच्या काळात विवाह सोहळ्यांमध्ये अनावश्यक खर्च आणि रूढ प्रथांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो.अशा परिस्थितीत ‘सत्काराऐवजी समाजसेवा’ हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवत जोशी कुटुंबीयांनी एक सकारात्मक आणि अनुकरणीय संदेश दिला आहे.

“विवाहाचा आनंद साजरा करताना समाजासाठीही काहीतरी देणे” या भावनेतून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सिन्नर तालुक्यात कौतुक होत असून,हा विवाह निश्चितच आगळावेगळा आणि समाजाला प्रेरणा देणारा विवाह सोहळा ठरला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!