पुणे (प्नतिनिधी) येथील मानवतावादी बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाजभूषण राज्यस्तरीय या वर्षाचा पुरस्कार नुकताच कवी लेखक दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी इतिहास संशोधक मंडळाचे डॉ. श्रीमंत कोकाटे, मानवतावादी संस्थेच्या प्रा.सुरेखा भालेराव डॉ.दिपा श्रावस्ती,शोभा शिरठोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हृदयमानव अशोक यांनी अनेक लघुचित्रपटातून सामाजिक आणि मानवतावादी विषय मांडले आहेत तसेच शाळा कॉलेज गावपातळीवर जाऊन ते नेहमी संविधान आणि संविधानिक मुल्ये मांडत असतात व्हेअर इज भिडेवाडा, दीक्षा,सुगंधा आदी अनेक सामाजिक मुल्ये त्यांनी मांडले आहे.
चळवळीच्या विचाराने बांधलेल्या हृदयमानव अशोक यांना पुरस्कार प्रदान होताच त्यांचें सर्वत्र कौतुक होत आहे.
