श्रीरामपूर (प्रतिनिधी) भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव आणि दादासाहेब रुपवते जन्म शताब्दी सोहळा या निमित्ताने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फूले जयंती निमित्ताने दादासाहेब रूपवते कार्यकर्ता पुरस्काराने श्रीरामपूर येथील मुक्त पत्रकार दिपक कदम यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी पुरस्काराने सन्मानित करताना प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी मा.उत्कर्षा रूपवते, सुप्रसिद्ध विधीतज्ञ संघराज रूपवते,अध्यक्ष प्रा.डॉ.सुरेंद्र जोंधळे,प्रा.श्रीरजंन आवटे, प्रा.मिलिंद कसबे,प्रा.राहुल गोंगे इ. मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
याप्रसंगी लोकनेते.बाळासाहेब थोरात, मा.आ. लहु कानडे, डॉ.सुधीर तांबे,.सौ.दुर्गा तांबे,प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रा. डॉ.सुरेन्द्र जोंधळे आदी मान्यवर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
