श्रीरामपूर दिपक कदम चांदेगाव कानिफनाथ मंदिर मंडळाच्या वतीने नुकताच "संसिद्धी फाउंडेशन"च्या सामाजिक सेवेला गौरवण्यात आले.
कानिफनाथ मंदिर मढी येथे आयोजित कार्यक्रमात फाउंडेशनच्या कार्याला मान्यता देत अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणाले, "आज आम्हाला चांदेगाव कानिफनाथ मंडळाची सेवा करण्याची संधी मिळाली, हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. मंदिर मढी येथे सत्कार होणे हे आमच्यासाठी प्रेरणादायक आहे. यापुढेही असेच सामाजिक उपक्रम हाती घेण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत."
कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते व फाउंडेशनच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.