माझे संशोधन..माझ्या समाजासाठी राज्यस्तरीय शोध निबंध स्पर्धांचे आयोजन
आश्वी खुर्द-भगवान बुध्द व महामानव आंबेडकर
संयुक्त जयंती महोत्सव समितीच्याद्वारे आश्वी पंचक्रोशीतील नागरिकांना बरोबर घेऊन आपल्या महापुरुषांच्या कार्यकर्तुत्वाला साजेसा जयंती ऊत्सव गेल्या एक दशकाहुन अधिक काळापासून येथे सुरु आहे. गावाचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.अलका गायकवाड यांनी या महोत्सवाचे ध्वजारोहण करून उदघाटन केले.
यावेळी समितीचे सदस्य व विविध क्षेत्रातील अनुयायी सकाळपासून बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते सौ.अलका बापूसाहेब गायकवाड यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व वंदना सूत्रपठणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रास्ताविक भाषणात राजेंद्र मुन्तोडे यांनी जयंती समितीच्या कार्याचा आढावा व पुढील कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
जयंती समितीचे प्रमुख समन्वयक अनिल मुन्तोडे यांनी भगवान बुद्ध व विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्या जात असल्याचे सांगून यावर्षी राज्यातील सामाजिक विषयावर राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन राज्यासह लगतच्या राज्यातील नामवंत संशोधक आश्वी येथे १२ मे बुद्धपौर्णिमा या सांगता प्रसंगी भेट देणार आहे.
याविषयी सविस्तर बोलताना मुन्तोडे म्हणाले,केवळ माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करा त्यासाठी तुम्ही प्राणाची बाजी लावा' या बाबासाहेबांच्या विचाराला आधार बनवून समिती वाटचाल करीत आहे. यासाठी सुमारे एक महिन्याचा महामानवाच्या विचारांचा जागर करण्याचा कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने आखण्यात आला असून त्याची सुरुवात करण्यात आली.यासाठी आश्वी आणि परिसरातील ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
निवृत्त प्राचार्य विठ्ठल वर्पे यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून इतर गावांनी आपल्या जयंतीच्या पॅटर्नचे अनुकरण करावे असे आवाहन केले.
सम्यक बुद्धविहार परिसरात सडा रांगोळी आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यावेळी अनिल भोसले व सौ.अलका गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी बाबासाहेब भवर,सोपान सोनवणे, संजय भोसले,आशा मुन्तोडे,,जगदीश मुन्तोडे,बापूसाहेब भवर,एकनाथ मुन्तोडे,संजय देशमुख, देविदास वाळेकर,संजय खरात,विकास गायकवाड. संतोष भडकवाड, भाऊसाहेब मुन्तोडे,बबन मुन्तोडे,भाऊसाहेब गाडे ,श्रीरंग कदम,कैलास पगारे,बंडू मुन्तोडे,कैलास मुन्तोडे रावसाहेब मुन्तोडे,आकाश मुन्तोडे,सिद्धार्थ मुन्तोडे,अर्जुन मुन्तोडे गौरव,प्रतीक मुन्तोडे, मुन्तोडे,शकुंतला जाधव,अलिशा मुन्तोडे, वर्षा मुन्तोडे, संगिता मुन्तोडे, साधना मुन्तोडे ,रेणुका मुन्तोडे साक्षी मुन्तोडे, श्रेया मुन्तोडे उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुशिल मुन्तोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बबन मुन्तोडे यांनी केले.सांगते प्रसंगी उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
