नागपूरची भाग्यश्री नैकेले स्वबळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण

Cityline Media
0
अभ्यासाच्या कुठल्याही सोयी नसताना भाग्यश्रीने मिळविला  ७३७ क्रमांकाने घवघवीत यश

नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क दिल्ली अथवा पुण्यात न जाता,कोणतेही क्लासेस न लावता,वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून टेस्ट सीरिज स्वतः केली व नागपुरातच घरीज्ञअभ्यास करून भाग्यश्रीने नैकेले केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळाल्याने तिघे सर्वत्र कौतुक होत आहे.
भाग्यश्रीचा जन्म टिमकी नागपूर येथील आहे. १२ वी पर्यंतचे शिक्षण नागपुरातच पूर्ण केले. वडिलांना जयपूर राजस्थान येथे काम मिळाल्याने ३ वर्ष संपूर्ण परिवार जयपूरला वास्तव्यास होते. तिथे भाग्यश्रीने पदवी घेतली घरची परिस्थित जेमतेम आहे,वडिलांना मदत व्हावी म्हणून तिने दोन वर्ष डिजिटल मार्केटिंगचे काम केले.परंतु मुलीचे आयएएस बनण्याचे स्वप्न आहे म्हणून वडिलांनी तिला नोकरी सोडायला लावली. दोन वेळा परीक्षा दिली त्यात पूर्व परीक्षा पास होऊ शकली नाही.परंतु परिस्थितीचा कुठलाही बाऊ न करता कमीत कमी संसाधनामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा वेळी परीक्षा दिली यात तिने ७३७ रँक मिळवतपरिक्षा उत्तिर्ण केली. 

भाग्यश्री सध्या परिवारासोबत  दिघोरी परिसरात भाडोत्री घरात राहते.त्यांचे स्वतःचे घर नाही. वडील इलेक्ट्रिकचे काम करतात. कधी काम असतो कधी नाही. म्हणून मागील चार महिन्यापासून त्यांनी घराचे भाडे सुद्धा दिले नाही. मागील दोन वर्ष मुलीकडे लॅपटॉप नव्हता मुलीला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अभ्यास करता यावा तिचा अभ्यास बुडू नये म्हणून वडीलांनी मासिक फायनान्सवर लॅपटॉप खरेदी केले. दोन महिने हप्ते देखील भरले नाही म्हणून फायनान्स कंपनीवाले घरी येऊन लॅपटॉप परत नेण्याची भाषा करू लागले.वडिलांनी त्यांना विनवणी करून ३ दिवसात पैसे भरतो असे सांगून  कसातरी लॅपटॉप वाचविला.हा परिवार गरीब आहे म्हणून बरेच नातेवाईक त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नव्हते. याचे दुःख त्यांना व्हायचे. 

पुस्तके खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून मोजक्या लागतील तितक्याच किंवा त्याहीपेक्षा कमी पुस्तके,नोट्स वर तिने अभ्यास केला.अभ्यासिकेसाठी खर्च होईल म्हणून भाग्यश्रीने घरीच एका खोलीत अभ्यास करण्याचे ठरवले.१० लाख विद्यार्थ्यांमधून पहिल्या एक हजार विद्यार्थ्यांमध्ये येणे हेच खूप आहे. 
भाग्यश्रीला यावेळी IRS (Income Tax) ही पोस्ट मिळेल.परंतु पुन्हा परीक्षा देऊन आय ए एस भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे.आम्हाला पूर्ण खात्री आहे ती नक्कीच पाहिजे ते यश संपादन करेल असा आशावाद तिच्या परिवाराने व्यक्त केला.
युपीएससीची परीक्षा पास करणे खूप कठीण आहे. त्यास खुप शैक्षणिक साधने लागतात दिल्ली अथवा पुण्यासारख्या ठिकाणी राहुन अभ्यास करावा लागतो दिल्ली आणि पुण्यातील राहण्याचा,क्लासेसचा खर्च खूप जास्त आहे.
बरेच हुशार परंतु गरीब विद्यार्थी युपीएससी साठीचा खर्च खूप जास्त आहे म्हणून त्याक्षेत्राकडे जात नाहीत.
परंतु भाग्यश्रीने दाखवून दिले की जिद्द आणि विश्वास असेल तर कमीत कमी संसाधनामध्ये सुद्धा कितीही मोठी परीक्षा पास करता येते. प्रत्येकाने युपीएससी केलीच पाहिजे असे नाही. परंतु छोटे स्वप्न बघणे गुन्हा आहे. आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात आपण मोठ करण्याचे स्वप्न बघितले पाहिजे.

काल तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. तिच्या यशात आईवडिलांचा सुद्धा मोठा वाटा आहे म्हणून तिच्यासोबत तिच्या आईवडिलांचा सुद्धा सत्कार केला.
पुढील परीक्षेत कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन तर्फे तिला मदत करण्याचे ठरवले आहे. इतक्या बिकट परिस्थितीत ती तीन वर्ष टिकून राहिली एक ध्येय समोर ठेवून तिने हे यश संपादन केले आहे. भाग्यश्रीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
- उमेश कोर्राम 
स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन.
- पीयूष आकरे- संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!