आशा गट प्रवर्तक संघटनेच्या कार्यकारणीवर कॉम्रेड सुरेश पानसरे आणि कॉम्रेड ज्योती पंडुरे यांची निवड

Cityline Media
0
कोल्हार प्रतिनिधी आशा गट प्रवर्तक संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी कॉ.ॲड.सुधीर टोकेकर यांची तर राज्य कार्यकारणीवर कॉ.सुरेश पानसरे सुवर्णा थोरात व कॉ.ज्योती विलास पंडुरे या अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली.
गोंदिया येथील राज्य अधिवेशनात हि निवड केल्याचे जाहीर करण्यात आले आयटकसह केंद्रीय कामगार संघटनांनी कामगार विरोधी श्रम संहिता कायद्या विरोधात येत्या २० मे रोजी संप पुकारला आहे .
गोंदिया येथील अधीवेशनात कार्यकारीणीची निवड करण्यात आली त्यानुसार अध्यक्षपदी कॉ. नाशिकचे राजु देसले उपाध्यक्षपदी अहिल्यानगरचे ॲड.कॉ.सुधीर टोकेकर तर राज्य कार्यकारणीवर कोल्हार अहिल्यानगर येथील कॉ.सुरेश पानसरे कॉ.सुवर्णा थोरात कॉ.ज्योती विलास पंडुरे यांची नियुक्ती करण्यात आली.
सदर अधिवेशनात विविध ठराव करण्यात आले.अधिवेशनात अहमदनगर जिल्ह्यातून कॉ.जयश्री गुरव कॉ.मिना बनकर उपस्थित होत्या.राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा आणला आहे तो संविधान विरोधी आहे,सरकार विरोधी आंदोलन दाबण्याचा व अभिव्यक्ती विरोधी आहे सदर कायदा ताबडतोब मागे घ्या.आशा व गट प्रवर्तकांना पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमा द्या.महापुरुषांच्या बदनामी करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करामहिला अत्याचार रोखण्यासाठी कठोर धोरण राबवा आशा गट प्रवर्तकांना सहा महीन्याची भर पगारी रजा द्या .
नवीन पदाधिकारी यांचा सत्कार जेष्ठ कम्युनिष्ट नेते शिवकुमार गनविर यांचे हस्ते करण्यात आला ॲड. कॉ . सुधीर टोकेकर यांची मेमेंटो कॉ.सुरेश पानसरे यांनी स्विकारली हे अधिवेशन गोंदिया येथे नुकतेच पार पडले.
अंतिमतः कॉम्रेड मुगाजी बुरुड यांनी सर्वांचा आभार मानले.

सायंकाळी जम्मु काश्मिर मधील पहेलगाम येथील भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या बेछुट गोळीबार व त्यात मृत्युमुखी पडलेल भारतीय नागरीक यांना कँडल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!