मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीची मंत्री दादा भुसे यांच्याकडून पाहणी

Cityline Media
0
 नाशिक दिनकर गायकवाड- राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मुळेगाव (ता.इगतपुरी) येथील जिंदाल पॉलिफिल्म या कंपनीला भेट देऊन पाहणी केली.
जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला दोन दिवसांपूर्वी लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली.तत्तेच सुरक्षेबाबत सूचना केल्या, यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओम्‌कार पवार, तहसीलदार अभिजित बारायकर उपस्थित होते.

मंत्री भुसे यांनी सांगितले, की आग विझविण्यास प्राधान्य देण्यात आहे आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमुळे

परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत, तर पंचनामे करण्याये निर्देश देण्यात येतील. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आगीच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षा प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात अशाही सूचना त्यांनी केल्या.उपविभागीय अधिकारी पवार यांनी जिंदाल कंपनीला लागलेली आग विझविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची नाहिती दिली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!